Paithan Crime | बिडकीनमध्ये बॅनर फाडल्याच्या कारणावरून २ गटात हाणामारी; तरुणाचा मृत्यू

गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
Bidkin banner tearing dispute  youth killed
तन्मय चोरमारे(Pudhari Photo)
Published on
Updated on

Bidkin banner tearing dispute youth killed

पैठण : पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात बॅनर फाडल्याच्या किरकोळ कारणावरून गुरुवारी (दि.२३) रात्री दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत एका १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवारी रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास बिडकीन बसस्थानक परिसरात दोन गटांमध्ये बॅनर फाडल्याच्या कारणावरून वाद झाला. वाद चिघळताच तुंबळ मारहाण झाली. यात तन्मय चोरमारे (वय १७, रा. बिडकीन) आणि संतोष ठाणगे हे दोघे गंभीर जखमी झाले.

Bidkin banner tearing dispute  youth killed
अतिवृष्टी, महापूर संकटातून सावरत नाही तोच पैठण तालुक्यात पुन्हा पावसाचे थैमान

दोघांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शुक्रवारी (दि.२४) सकाळी तन्मय चोरमारे या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

गावात तणाव; पोलीस बंदोबस्त तैनात

मृत्यूची बातमी पसरताच बिडकीनमध्ये तणाव निर्माण झाला. मृत तरुणाच्या नातेवाईक आणि व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांचे व्यवहार बंद ठेवले. परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. दंगा काबू पथकासह मोठा पोलीस बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला असून बिडकीन परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.

Bidkin banner tearing dispute  youth killed
Paithan accident: नियतीने घात केला! पैठण नगरपरिषदचे माजी उपाअध्यक्ष अन् शिक्षकाचा भीषण अपघातात मृत्यू; परिसरात हळहळ व्यक्त

पाच जण ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. तथापि, घटनेचा गुन्हा अद्याप नोंदवला नसल्याचे बिडकीन पोलिसांनी सांगितले.

बिडकीन परिसरात अवैध धंदे

मागील काही दिवसांपासून बिडकीन परिसरात अवैध धंदे, चक्री, मटका, जुगार यामुळे स्थानिक पोलीस ठाणे चर्चेत आहे. ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त ‘चांदीचे शिक्के’ देण्यात आल्याची चर्चा सुरू असतानाच या हाणामारीची घटना घडल्याने पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news