Youth Drown : केसापुरी धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू

दौलताबाद येथील केसापुरी शिवारातील धबधब्याच्या पाण्यात बुडून एका २१ वर्षीय युवकाचा रविवारी (दि.५) मृत्यू झाला.
Drowning Death
Drowning Death File Photo
Published on
Updated on

Youth drowns in Kesapuri waterfall

खुलताबाद, पुढारी वृत्तसेवा : दौलताबाद येथील केसापुरी शिवारातील धबधब्याच्या पाण्यात बुडून एका २१ वर्षीय युवकाचा रविवारी (दि.५) मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Drowning Death
Crime News : स्क्रॅप व्यावसायिकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

मृत युवकाचे नाव प्रथमेश शांतिलाल गायकवाड (२१, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) असे आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने प्रथमेश मित्रांसोबत केसापुरी येथील धबधबा पाहण्यासाठी आला होता. पावसामुळे धबधब्याखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचले असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच मित्रांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. काही वेळाने प्रथमेशला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

Drowning Death
Kej Crime : केज खूनप्रकरण तापले; अंत्यसंस्कार रोखून कुटुंबीयांचा ठिय्या

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. पुढील तपास सुरू आहे.

पर्यटकांनी घ्यावी खबरदारी

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे दौलताबाद-केसापुरी परिसरातील धबधबे आणि नैसर्गिक स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. मात्र पाण्याची खोली, निसरडे दगड आणि वाढलेला पाण्याचा प्रवाह यामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, तर प्रशासनानेही सूचना फलक, सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news