Crime News : स्क्रॅप व्यावसायिकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या

जालना रोडवर रक्ताचा सडा
Crime News
Crime News : स्क्रॅप व्यावसायिकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्याfile photo
Published on
Updated on

Scrap dealer brutally stabbed to death

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा दिवसंरात्र अत्यंत वर्दळीच्या जालना रोडवर गुरुवारी (दि.२) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास एका ६४ वर्षीय स्क्रॅप व्यावसायिकाची मांडीत चाकू खुपसून निघृण हत्या करण्यात आली. आकाशवाणी चौकाजवळ घडलेल्या या थराराने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Crime News
Crime News : धक्कादायक : घराच्या मालकी हक्कावरून पोटच्या मुलानेच बापाचा काटा काढला

अब्दुल बासित हकीम मृत बासित खान खान (६४, रा. कैसर कॉलनी) असे मृताचे नाव आहे. सुरुवातीला हा प्रकार मोबाईल चोरीच्या उद्देशातून घडल्याचा संशय होता. मात्र 'व्यावसायिकाकडे असलेल्या मोठ्या रकमेच्या बॅगसाठीच पाळत ठेवून हा खून करण्यात आल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, रात्री उशिरा गुन्हे शाखेने मुकुंदवाडीतील दोन कुख्यात गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

अधिक माहितीनुसार, घटनास्थळी पोलिसांना मृत अब्दुल बासित यांच्या खिशात ५०० रुपये मिळाले, मात्र त्यांचा मोबाईल गायब होता. त्यामुळे ही मोबाईलसाठी झालेली लूट असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता, परंतु नातेवाइकांच्या दाव्याने तपासाला वेगळे वळण लागले आहे. अब्दुल बासित हे टक्केवारीवर भंगार खरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार करत होते. एका मोठ्या व्यवहारापोटी त्यांना एका व्यक्तीकडून मोठी रोख रक्कम मिळाली होती आणि ती रक्कम बॅगेत घेऊन ते पायी चालले होते. हल्लेखोरांना या पैशाची पक्की खबर असावी, म्हणूनच त्यांनी पाळत ठेवून चाकूहल्ला केला आणि पैशाची बॅग पळवली, असा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, लुटमारीसाठी की पूर्वनियोजित कट होता याचा तपास पोलिस करत आहेत.

Crime News
Chatrapati Sambhajinagar : टीव्हीसेंटर चौकातील ऑक्सिजन हबवर कु-हाड

दोघांची कसून चौकशी सुरू

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले, सहायक आयुक्त मनोज पगारे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक गजानन कल्याणकर, जिन्सीचे निरीक्षक गणेश ताठे, सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन हल्लेखोर अपेक्स हॉस्पिटलच्या दिशेने दुचाकीवरून जाताना कैद झाले. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या आधारे निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक अभिजित चिखलीकर आणि अर्जुन कदम यांच्या पथकाने रात्री उशिरा मुकुंदवाडी भागातून दोन कुख्यात गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

असा घडला मध्यरात्री थरार...

» रात्री ८.०० वाजता: अब्दुल बासित हे व्यवसायाच्या कामानिमित्त घराबाहेर पडले.

» मध्यरात्री १.०० वाजता त्यांनी मुलाला फोन करून 'तासाभरात घरी येतो', असे सांगितले.

» पहाटे २.०० वाजता पुन्हा फोन करून मुलाला घ्यायला बोलावले, पण दुचाकीत पेट्रोल नसल्याचे मुलाने सांगितले.

» पहाटे २.३० ते ३.०० वाजता ते जिन्सी भागातून सिडको चौकाच्या दिशेने जालना रोडने पायी निघाले. आकाशवाणी चौकातील पंचम बारसमोर येताच मागून दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीत सपासप चाकू खुपसला व त्यांना लुटून पसार झाले.

घाटीत दाखल केले, पण मृत्यूशी झुंज अपयशी

रस्त्यावर एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिसांच्या 'डायल ११२' पथकातील हवालदार वामन नागरे आणि सतीश सानप यांनी अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरे यांनी रुग्णवाहिकेची वाट न पाहता तातडीने एका रिक्षातून जखमी अब्दुल बासित यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी रक्तप्रवाह थांबवण्यासाठी टाकेही घेतले; मात्र मांडीतील शीर कापली गेल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. अखेर सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बासित यांचे बंधू वाजेद खान यांच्या तक्रारीवरून जिन्सी ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news