Crime News : अवैध धंद्यांना विरोध केल्याने तरुणाला बेदम मारहाण

८ जणांवर अॅट्रॉसिटी, तिघांना अटक; राहुलनगरातील घटना
sambhajinagar crime news
Crime News : अवैध धंद्यांना विरोध केल्याने तरुणाला बेदम मारहाणFile Photo
Published on
Updated on

Youth Brutally Beaten for Opposing Illegal Activities

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

राहुलनगर भागात अवैध धंद्यांविरुद्ध तक्रार दिल्याच्या कारणावरून टोळक्याने एका तरुणाला भर रस्त्यात गाठून बेदम मारहाण केली. घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली. या घटनेमुळे रविवारी (दि. २२) रात्री परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी सातारा ठाण्यात आठ जणांवर दंगलीसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली.

sambhajinagar crime news
बलात्काराची तक्रार देण्यास गेलेल्या पीडितेच्या पतीला पोलिसाची मारहाण ?

समीर कुरेशी, हबीब, शेख सलमान, सद्दाम कुरेशी, अरबाज ऊर्फ बाबा, अझहर, बोक्या व अन्य एक अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी श्रीकांत रोहिदास काकडे (२६, रा. राहुलनगर) हा तरुण रविवारी रात्री कामावरून घरी परतत होता. तेव्हा समीर कुरेशी आणि त्याच्या साथीदारांनी श्रीकांतला अडवले. तू आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार करतो का? असे म्हणत टोळीने श्रीकांत आणि त्याचा भाऊ मंगेश याला बेदम मारहाण केली.

त्यानंतर घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ करत परिसरात दहशत माजवली. या प्रकारामुळे राहुलनगर भागात मोठ्या प्रमाणात जमाव जमून तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच एसीपी मनीष कल्याणकर आणि पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता असून, तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त मनीष कल्याणकर यांनी दिली.

sambhajinagar crime news
Knife Attack : पाण्याचा ग्लास देण्यास नकार देताच पोलिसावर चाकूहल्ला

दुकानाच्या आडून नशेचा बाजार

सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींद्वारे मांस विक्रीच्या दुकानातून नशेच्या गोळ्या, सिरपची सर्रास विक्री केली जात होती. तरुण मुले आणि मजूर वर्गाला लक्ष्य करून हा काळाबाजार सुरू होता. यामुळे वस्तीतील महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने, श्रीकांतने याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्याचे धाडस दाखवले. मात्र, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या टोळीने त्यालाच लक्ष्य करत मारहाण केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news