

Youth attempts self-immolation for reservation for Banjara community
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाडा मुक्तिसंग्रामचा कार्यक्रम सुरू असताना बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करत हातात कॅन घेऊन सिद्धार्थ उद्यानाकडे आत्मदहन करण्यासाठी निघालेल्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तो अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करणार होता. मात्र पोलिस अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेत एकाला तात्काळ ताब्यात घेतले.
यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हा प्रकार वरद गणेश मंदिर चौकाजवळ घडला. पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे, गणेश ताठे, चिकलठाण्याचे निरीक्षक रविकिरण दरवडे, विशेष शाखेचे पीएसआय दीपक परदेशी, अंमलदार दत्ता व्होरकटे आदींनी आंदोलक रविकांत पवारसह अन्य तीन ते चार जणांना चिकलठाणा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.