

Young woman tortured, poison poured into her mouth
कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील एका गावातील २१ वर्षीय तरुणीवर घरात झोपलेली असताना अत्याचार करून तोंडात विषारी औषध कोंबल्याप्रकरणी धुळे शहर पोलिस ठाण्यात झिरो एफ.आय.आर. दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा घटनास्थळाच्या हद्दीत येत असल्याने तो वर्ग करून कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे.
वाडीलाल बद्रीनाथ चव्हाण (रा. भिलदरी, ता. नागद) असे आर ोपीचे नाव असून, त्यास शनिवारी (दि.१) पोलिस उपनिरीक्षक अमोल जाधव यांच्या पथकाने तात्काळ शोध घेऊन अटक केली व त्यास न्यायलयासमोर हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली.
पीडिता ही आपल्या राहत्या घरात पुढील खोलीत झोपलेली असताना आरोपी वाडीलाल घरात घुसला व तिच्याशी जबरदस्ती करू लागला. फिर्यादीने त्याच्याशी लग्नाचा विषय काढला असता आरोपीला राग आला. फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने तोंड दाबून बलात्कार केला आणि तिच्या तोंडात विषारी औषध कोंबले. यादरम्यान फिर्यादीने आरडाओरड केल्यावर वरच्या मजल्यावर झोपलेले तिचे वडील खाली धावत आले.
तेव्हा आरोपी तेथून पळून गेला. आर-ोपीने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाख-वून लग्न मोडण्यास भाग पाडले आणि लग्न करावे लागू नये म्हणून तिच्यावर बलात्कार करून विषारी औषध पाजून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे घटनास्थळ हे कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याने धुळे शहर पोलिस ठाण्यातील झिरो एफ.आय.आर. प्रमाणे वर्ग करण्यात आला असून, पुढील तपास सपोनि रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अमोल जाधव करत आहेत.