Ambadas Danve
Ambadas Danve : घरात बसून शिगारेट फुंकणाऱ्यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलू नये File Photo

Ambadas Danve : घरात बसून शिगारेट फुंकणाऱ्यांनी ठाकरेंच्या दौऱ्यावर बोलू नये

पालकमंत्री शिरसाट यांना अंबादास दानवे यांचे उत्तर
Published on

Ambadas Danve's reply to Guardian Minister Shirsat

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घरात बसून शिगारेट फुंकणाऱ्यांनी आणि रात्र ऐशोआरामात घालणाऱ्या पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर बोलू नये, अशा शब्दांत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी (दि. २) शिरसाट यांना सुनावले.

Ambadas Danve
Heavy Rain : पुन्हा जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले

पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर काल जोरदार टीका केली होती. त्याला अंबादास दानवे यांनी उत्तर दिले. घरात बसून शिगारेट फुंकणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबद्दल बोलू नये, त्यांची लायकी नाही, रात्र ऐशोआरामात घालणारे हे मंत्री आहेत, असे दानवे म्हणाले.

Ambadas Danve
MSRTC : एसटीला दिवाळी पावली : १६ कोटी ५२ लाखांचे उत्पन्न

आगामी जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकीत सन्मानपूर्वक जागांचे वाटप झाले नाही तर स्वबळावर निवडणूक लढवणार, असे वक्तव्य मंत्री शंभूराजे देसाई यांनी केले. याबद्दल दानवे म्हणाले, मिधे गटाच्या मंत्र्यांना कोणत्याही विभागात विचारले जात नाही, त्यांचा पदोपदी अपमान केला जात आहे, आगामी निवडणुकीत भाजप जसे म्हणेल ते त्यांना वागावेच लागेल, अशी टीकाही दानवे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news