Sambhajinagar Crime News : निघून जा म्हटल्याचा राग आल्याने तरुणाने वृद्ध महिलेचे घर पेटविले

हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.१९) रात्री पावणेअकरा ते अकरा वाजेदरम्यान तारकस गल्ली, बेगमपुरा भागात घडला.
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime News : निघून जा म्हटल्याचा राग आल्याने तरुणाने वृद्ध महिलेचे घर पेटविलेFile Photo
Published on
Updated on

Young man sets old woman's house on fire

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा घरातून बाहेर जा, मला माझ्या मुलीकडे जायचे आहे, असे म्हटल्याचा राग आल्याने एकाच इमारतीत भाड्याने राहणाऱ्या तरुणाने वृद्ध महिला बाहेर जाताच तिचे घर पेटवून दिले. हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.१९) रात्री पावणेअकरा ते अकरा वाजेदरम्यान तारकस गल्ली, बेगमपुरा भागात घडला.

Sambhajinagar Crime News
Municipal Council Election : मराठवाड्यात महायुतीत फूट; आघाडीत बिघाडी

मयूर शिवप्रसाद शर्मा (३२, रा. तारकास गल्ली) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी शांताबाई आसाराम शिंदे (७०) या संजय राठोड यांच्या इमारतीत भाड्याने पहिल्या मजल्यावर नातू हृतिक सांबळे सोबत राहतात. तर ग्राउंड फ्लोरवर शिवप्रसाद ओमकारलाल शर्मा हे त्यांचा मुलगा मयूर सोबत भाड्याने राहतात.

बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास शांताबाई घरात काम करत असताना आरोपी मयूर घरात आला. आई जेवण झाले का, असे म्हणत गप्पा मारू लागला. परंतु शांताबाई यांना मुलीकडे जायचे असल्याने त्यांनी मयूरला घरातून बाहेर जा, मला मुलीकडे जायचे आहे, असे म्हटले. त्यावर मयूरने राग आल्याने, म्हतारे निघ इथून, तू गेली की मी तुझे घर जाळतो, अशी धमकी दिली.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar News : पैठणगेटवर अर्धवट पाडलेल्या दुकानांतूनच व्यवसाय सुरू

त्याच्याकडे दुर्लक्ष करून शांताबाई मुलगी वंदना इथापे (रा. ढिंबरगल्ली, बेगमपुरा) हिच्याकडे निघून गेल्या. पंधरा मिनिटांत रात्री अकराच्या सुमारास वंदना यांना गल्लीतील एकाने फोन करून तुमच्या आईच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. शांताबाईसह सर्वांनी धाव घेतली. अग्निशमन व पोलिसांना बोलावून घेतले. लोकांच्या मदतीने आग विझवली. घटनेत त्यांचे २५ हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news