Sambhajinagar News : कारने उडवले, यू-टर्न घेऊन परत आला अन् भररस्त्यात डोके ठेचून संपविले

सिडको एन-७ चौकाजवळ भरदिवसा तरुणाची निघृण हत्या : जिममधील स्टेटसवरून पाळत, १५० फूट फरफटली मोपेड
Sambhajinagar News
Sambhajinagar News : कारने उडवले, यू-टर्न घेऊन परत आला अन् भररस्त्यात डोके ठेचून संपविलेfile photo
Published on: 
Updated on: 

Young man brutally murdered in broad daylight near CIDCO N-7 Square

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा वर्चस्वाच्या वादातून भररस्त्यात एका तरुणाची अंगाचा थरकाप उडवणाऱ्या आरोपी पवन पराशर पद्धतीने निघृण हत्या करण्यात आली. आझाद चौकातील जिममधून मोपेडवर घराकडे जाणाऱ्या तरुणाचा कारने सुसाट पाठलाग करून त्याला पाठीमागून उडवले. धडकेमुळे तरुण आदळला, तर त्याची मोपेड तब्बल १५० फूट कारने फरफटत एन ७ चौकापर्यंत नेली.

Sambhajinagar News
Graduate Constituency Election : पदवीधरसाठी आज ८४२ केंद्रांवर मतदान

हल्लेखोराने चौकातून कारचा यू-टर्न घेऊन परत येत, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेल्या तरुणाचे दांड्याने एकापाठोपाठ एक जोरदार प्रहार करून चेहरा, डोके अक्षरशः ठेचून काढले. हा थरार सिडको एन-७ चौकाजवळ सकाळी १०.२० ते १०.४० वाजेच्या सुमारास घडला. हत्येनंतर हल्लेखोर दांडा कारमध्ये टाकून थेट सिडको पोलिस ठाण्यात हजर झाला.

बंटी ऊर्फ देवेश चंद्रेश दीक्षित (वय ३७, रा. एन-७, सिडको) असे निघृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी पवन दिलीप पराशर (वय २२, रा. सिडको एन- ७) याला ताब्यात घेतले आहे. भरदिवसा आणि नागरिकांच्या डोळ्यांसमोर हा रक्तरंजित थरार घडल्याने संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

Sambhajinagar News
Marathwada News : मराठवाड्यात ९ महिन्यांत ७६० शेतकऱ्यांनी जीवन संपवले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बंटी दीक्षित हा गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे आझाद चौक परिसरातील एका जिममध्ये व्यायामासाठी गेला होता. त्याचे जिममधील फोटो आरोपीला एकाच्या स्टेटसला दिसले. महिनाभरापासून त्याच्यावर पाळत ठेवून असलेला आरोपी पवन पराशर याने ते स्टेटस पाहिले आणि तो तात्काळ जिमबाहेर दबा धरून बसला. बंटी आपली मोपेड घेऊन सिडको एन-७ मधील घराकडे निघाला असता, पवनने स्वतःच्या कारने (एमएच-१९-बीजे ८३८४) त्याचा पाठलाग सुरू केला.

सिडको एन-७ चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मंगेश गॅस एजन्सीसमोर पवनने बंटीच्या मोपेडला भरधाव वेगात पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की बंटी हवेत उडून कारच्या काचेवर व त्यानंतर रस्त्यावर कोसळला, तर त्याची मोपेड पवनने तब्बल १५० फूट अंतरावर असलेल्या विश्वास वाईन शॉपपर्यंत फरफटत नेली. त्यानंतर कार सिडको एन ७ चौकातून पुन्हा यु-टर्न घेऊन बंटी पडलेल्या ठिकाणी आणली व मंगेश गॅस एजन्सीजवळच्या भिंतीला धडकवून थांबवली.

पवनने कारमधून लाकडी दांडा बाहेर काढला आणि रस्त्यावर जखमी पडलेल्या बंटीच्या डोक्यात एकापाठोपाठ एक सपासप प्रहार केले. त्याने बंटीचे डोके अक्षरशः ठेचून त्याचा जागीच जीव घेतला. पोलिसांनी आरोपी पवन पराशर याला अटक केली आहे. याप्रकरणी मृत बंटी याचा भाऊ अभिनय ऊर्फ सनी दीक्षित यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news