

In Marathwada, 760 farmers ended their lives in 9 months
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात सततच्या नापिकी ओला-सुका दुष्काळी ७६० परिस्थितीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांतच विभागात तब्बल शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली असून त्यातील ४०३ आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरले तर ७५ अपात्र आणि २८२ प्रकरणात चौकशी सुरू आहे. ९ महिन्यांत सर्वाधिक १०८ आत्महत्या सप्टेंबरमध्ये झाल्याने कमी पावसाचा हा परिणाम असल्याचेच चित्र दिसत आहे.
मराठवाड्यातील अल्पभूधारक शेतकरी सततच्या नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळेच दरवर्षी विभागात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहेत. यंदाही हे सत्र थांबलेले नसून विभागात ९ महिन्यातच आकडेवारी साडेसातशे पार पोहचली आहे. यंदा वर्षाच्या सुरुवातीला शेतकरी आत्महत्यांच्या नोंदी तुलनेने कमी होत्या.
जानेवारीत ७७, फेब्रुवारीत ५९ शेतकरी आत्महत्या ८० च्या आत होत्या. परंतु, मार्चपासून आत्महत्यांचे सत्र वाढण्यास सुरुवात झाली. ८२ प्रकरणे या महिन्यात नोंदविण्यात आली. एप्रिलमध्ये त्यानंतर एप्रिलमध्ये पुन्हा आकडेवारी ७५ वर आली आणि मे मध्ये ८१ त्यानंतर जूनमध्ये ९० वर आकडेवारी पोहचली.
जुलैमध्ये हा आकडा १०५ त्यानंतर ऑगस्टमध्ये ८३ घटना होत्या. सप्टेंबरमध्ये मागील आठ महिन्यांचा रेकॉर्ड मोडला. या एका महिन्यात तब्बल १०८ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. त्यामुळे कमी पाऊस आणि दुष्काळी स्थिती व खरिपाच्या नुकसानीमुळेच या महिन्यात आत्महत्या वाढल्याचे चित्र दिसत आहे.