Gold Ganthan Snatched : महिलेचे दोन तोळ्यांचे गंठण हिसकावले

हायकोर्ट सिग्नलपासून कामगार चौकाकडे येताना हेल्मेटधारी दुचाकीस्वारांचा डल्ला
Gold Ganthan Snatched
Gold Ganthan Snatched : महिलेचे दोन तोळ्यांचे गंठण हिसकावलेfile photo
Published on: 
Updated on: 

Woman’s two-tola gold ganthan snatched

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दिराच्या घरून स्कुटीवरून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण हेल्मेटधारी दुचाकीस्वारांनी हिसकावून पळ काढला. हिसकाहिसकीत सोन्याच्या साखळीचा काही तुकडा रस्त्यावर पडला, त्यामुळे अंदाजे दीड तोळा सोने चोरट्यांच्या हाती लागले. ही घटना सोमवारी (दि.१६) रात्री १०:०५ वाजेच्या सुमारास हायकोर्ट सिग्नल ते कामगार चौक रस्त्यावरील विभुते हॉस्पिटलसमोर घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gold Ganthan Snatched
Encroachment Drive : शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात

फिर्यादी रामेश्वरी इंद्रजीत जायभाये (४५, रा. जयभवानीनगर, गल्ली क्र. ३) यांच्या तक्रारीनुसार, सोमवारी रात्री त्या आणि त्यांची मुलगी वैष्णवी या दोघी स्कुटीवरून (क्र. एमएच-२०-एचयु-९१७९) एन-५ टाऊन सेंटर येथे राहणारे त्यांचे दीर हनुमंत जायभाये यांच्या घरी गेल्या होत्या. भेट आटोपून रात्री दोघी माय-लेकी घरी परतण्यासाठी निघाल्या. मुलगी वैष्णवी स्कुटी चालवत होती, तर रामेश्वरी या मागे बसल्या होत्या. द्वारकादासच्या पाठीमागील बाजूने येऊन हायकोर्ट सिग्नल येथून उजवीकडे वळून त्या कामगार चौकाकडे येत होत्या.

Gold Ganthan Snatched
Drug peddler : मांजावरील कारवाईने व्यवसाय ठप्प; पतंग विक्रेता बनला 'ड्रग पेडलर'

रात्री १०:०५ वाजेच्या सुमारास विभुते हॉस्पिटलसमोर आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून दोघेजण दुचाकीस्वार आले. दोघांनी ओळख लपविण्यासाठी डोक्यावर हेल्मेट घातलेले होते. त्यांनी वेगात चालत्या स्कुटीच्या अगदी जवळ येत एकाने रामेश्वरी यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे गंठण जोरात हिसकावले. या झटापटीत सोन्याच्या साखळीचा थोडासा तुकडा तुटून खाली पडला; मात्र मुख्य गंठण घेऊन दोन्ही चोरट्यांनी पळ काढला. हिसका बसल्याने दोघीही स्कुटीवरून पडता-पडता बचावल्या. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक अर्जुन राऊत करत आहेत.