Chhatrapati Sambhajinagar crime: पतीचे अनैतिक संबंध, जीव गेला पत्नीचा; सासूच्या डोळ्यासमोर सुनेचा अंत... संभाजीनगरात खळबळ

waluj mahanagar todays crime | वाळूज महानगरातील घटना
Chhatrapati Sambhajinagar crime: पतीचे अनैतिक संबंध, जीव गेला पत्नीचा; सासूच्या डोळ्यासमोर सुनेचा अंत... संभाजीनगरात खळबळ
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar waluj mahanagar crime

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून प्रियकराच्या पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वाळूज परिसरातील बजाजनगर येथे ही घटना घडली असून ही घटना मयत महिलेच्या सासूच्या डोळ्यादेखतच घडली. याप्रकरणी पोलिसांनी मारेकरी महिलेला अटक केली आहे.

Chhatrapati Sambhajinagar crime: पतीचे अनैतिक संबंध, जीव गेला पत्नीचा; सासूच्या डोळ्यासमोर सुनेचा अंत... संभाजीनगरात खळबळ
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

महेंद्र सोनपेटकर यांचे वाळूज एमआयडीसीत टूल शॉप असून पत्नी साधना, आई केशरबाई मुलगा दर्शन असे चौघे साई श्रद्धा पार्कमध्ये राहतात. तर त्यांचा मोठा मुलगा अभिषेक हा सोलापूर येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. आज सकाळी महेंद्र व त्यांची पत्नी लगतच्या मंदिरात दर्शनासाठी तर मुलगा दर्शन हा शाळेत गेला होता. केसरबाई या घरात एकट्या असतांना शैलजाही घरात आली.

Chhatrapati Sambhajinagar crime: पतीचे अनैतिक संबंध, जीव गेला पत्नीचा; सासूच्या डोळ्यासमोर सुनेचा अंत... संभाजीनगरात खळबळ
Chhatrapati Sambhajinagar | अल्पवयीन लुटारू...चेनस्नॅचिंग..शहरात रात्रीचा थरार! नागरिक दहशतीत

घरातील इतर लोक कुठे गेले आहेत अशी विचारणा करून तिने मुलाला कंपनीत लावायचे आहे अशी थाप मारली. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास साधना या मंदिरातून घरी परतताच शैलजाने दाराला आतून कुलूप लावून घेतले. व ती साधना यांच्यासोबत वाद घालू लागली. यावेळी केसरबाई यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शैलेजाने त्यांना बेडवर ढकलून देत बंदुकीचा धाक दाखवून तिने साधना यांच्या गळ्यावर चाकूने सपापसाप वार केले. साधना या रक्ताच्या थारोळ्यात निचपीत पडल्यानंतर देखील शैलेजाने त्यांच्या अंगावर चाकूने अनेक वार केले. दरम्यान केसरबाई यांनी प्रसंगावधान राखून बाजूला पडलेली बंदूक उचलून ती खिडकीतून फ्लॅटच्या खाली फेकून दिली.

Chhatrapati Sambhajinagar crime: पतीचे अनैतिक संबंध, जीव गेला पत्नीचा; सासूच्या डोळ्यासमोर सुनेचा अंत... संभाजीनगरात खळबळ
Jalgaon News: चोपड्यात भररस्त्यात 'करेक्ट कार्यक्रम'; जुन्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात खळबळ!

घरात आरडा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी याची माहिती महेंद्र तसेच पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, जमादार विशाल पाटील, पोलिस अंमलदार जयेश साळुंके, मनोज बनसोडे आदींनी वेळीच घटनास्थळी धाव घेवून दरवाजा तोडून आरोपी शैलजा सोनार हिला ताब्यात घेतले.

Chhatrapati Sambhajinagar crime: पतीचे अनैतिक संबंध, जीव गेला पत्नीचा; सासूच्या डोळ्यासमोर सुनेचा अंत... संभाजीनगरात खळबळ
Latur crime : रेणापूर तालुक्यात लूटमार अन्‌‍ चोरीच्या घटनांत वाढ

केसरबाई यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात शैलेजाने चाकूने वार करत माझ्या डोळ्यासमोर माझ्या सुनेचा खून केल्याचे सांगितले. दरम्यान पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. भागिरथी पवार, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

Chhatrapati Sambhajinagar crime: पतीचे अनैतिक संबंध, जीव गेला पत्नीचा; सासूच्या डोळ्यासमोर सुनेचा अंत... संभाजीनगरात खळबळ
Crime News | होळीच्‍या रात्री थरार ! वादातून पत्नीने पतीला जिवंत जाळलं; दारूच्या नशेत टोकाचं पाऊल

अनैतिक संबंधांतून हत्या?

साधना यांचे पती महेंद्र यांचे शैलजाशी अनैतिक संबंध होते. याला साधना सोनपेटकर यांनी विरोध केल्यामुळे दोघींमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून हा खून केल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news