winter season
थंडीची चाहूल, हवामानात गारवा वाढणारFile Photo

थंडीची चाहूल, हवामानात गारवा वाढणार

पावसाचा जोर ओसरणार : ८ नोव्हेंबरनंतर रात्रीच्या तापमानात घट होण्याची शक्यता
Published on

winter season start, cold climate in night

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी कोसळत असून, गेल्या दोन दिवसांपासून काही ठिकाणी जोरदार बरसला. मात्र ६ ते ८ नोव्हेंबरदरम्यान पावसाचा जोर ओसरणार आणि थंडीची चाहूल लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

winter season
School News : दिवाळी सुट्यानंतर आज पुन्हा वाजणार शाळांची घंटा

शहरासह परिसरात सध्या दिवसा ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या सुमारास हलका गारवा जाणवत आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. दरम्यान, पुढील आठवड्यापासून तापमान आणखी खाली येण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे काही ठिकाणी पिकांच्या कापणीचे काम थांबले होते, मात्र आता हवामान स्थिर होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. दिवाळीनंतरच्या या काळात साधारणपणे थंडीचा प्रारंभ होत असतो आणि यंदाही तोच ट्रेंड दिसत असून, ग्रामीण भागात शेतकरीवर्गात हिवाळ्याची चाहूल लागल्याची चर्चा सुरू आहे. तर अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र ८ नोव्हेंबरनंतर पूर्णपणे कमी होईल. त्यानंतर जिल्ह्यात रात्रीच्या तापमानात झपाट्याने घट होईल आणि हवेत गारवा वाढेल, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

winter season
Sambhajinagar Crime: कारमध्ये बस नाही तर वडिलांना मारून टाकीन, संभाजीनगरमध्ये धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

थंडीपासून बचावाची काळजी घ्या

शहर व परिसरातील किमान तापमानात पुढील आठवड्यापासून घट होणार असून, थंडी वाढणार आहे. थंडीची ही प्रारंभिक चाहूल असून, हळूहळू डिसेंबरअखेरपर्यंत त्यात वाढ होऊन आणखी तीव्र थंडी पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सकाळी व संध्याकाळी घराबाहेर पडताना थंडीपासून बचावाची काळजी घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news