Sambhajinagar News : महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नववर्ष उजाडणार?

उर्वरित कामांसाठी बांधकाम विभागाने मागितली तीन महिन्यांची मुदत
Sambhajinagar News
Sambhajinagar News : महिला व बाल रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी नववर्ष उजाडणार?file photo
Published on
Updated on

Will the New Year mark the inauguration of the Women and Children's Hospital?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना रोडवरील दूध डेअरीच्या जागेतील चारशे खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे काम मागील पाच वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. रुग्णालयाचे जवळपास ९० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. राहिलेल्या कामांसाठी बांधकाम विभागाने तीन महिन्यांची मुदत मागितली आहे. त्यामुळे हे रुग्णालय सुरू होण्यासाठी २०२७उजाडेल असे चित्र आहे.

Sambhajinagar News
ST bus : स्मार्ट तिकीट व्यवस्थेसोबत कागदी व्यवस्था

सार्वजनिक आरोग्य विभागाने २० सप्टेंबर २०१९ रोजी या २०० खाटांच्या रुग्णालयाच्या सहा मजली इमारतीसाठी १११.८९ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. २०२१ पासून हे काम सुरू आहे. एकूण १९,२७२ चौ.मी. क्षेत्रात रुग्णालयाच्या सहा मजली मुख्य इमारतीसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी सहा मजली तीन इमारतींचे बांधकाम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.

मध्यंतरी निधीअभावी अनेकदा रुग्णालयाचे काम रंगाळले होते. त्यामुळे हाच खर्च वाढून तब्बल १८९ कोटींवर गेला आहे. वाढीव निधीच्या मंजुरीनंतर पुन्हा एकदा रुग्णालयाचे काम सुरू झाले आहे. लिफ्ट, विद्युतीकरण, अंतर्गत रस्त्यांसह इतर किरकोळ कामे सुरू आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी तीन महिने म्हणजेच नोव्हेंबरपर्यंत मुदत लागेल, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने आरोग्य विभागाला दिले आहे. त्यामुळे गरोदर महिला व नवजात बाळांसाठी अति महत्त्वाच्या या रुग्णालयाचे उद्घाटन लांबणार आहे.

Sambhajinagar News
Crime News : न्यू विश्वास ज्वेलर्स चोरी प्रकरण : सोलापूरच्या टोळीचा पर्दाफाश

जानेवारीत रुग्णालय सुरू होईल

महिला व बाल रुग्णालयाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तीन महिने लागतील, असे पत्र बांधकाम विभागाने दिले आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत रुग्णालयाचे आयोग्य विभागाकडे हस्तांतरण होईल. आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. कांचन वानेरे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news