Sambhajinagar News : देवाची ४१ एकर जागा विकणाऱ्यांना अभय कोणाचे ?

श्री रामचंद्र मंदिर बालाजी ट्रस्ट प्रकरण; गुन्हा दाखल करण्यास मनपाची टाळाटाळ
Sambhajinagar News
Sambhajinagar News : देवाची ४१ एकर जागा विकणाऱ्यांना अभय कोणाचे ?file photo
Published on: 
Updated on: 

Who is shielding those who sold 41 acres of land belonging to the deity?

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जाधववाडी मोंढ्यापासून काही अंतरावर असलेल्या श्री रामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्टच्या ४१ एकर जागेवर झालेली अवैध प्लॉटिंग गेल्या महिन्यातच महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने निष्कासित केली. विशेष म्हणजे वर्ग २ च्या खिदमत मासमध्ये मोडणाऱ्या देवाच्या या जागेतील ८० ते ९० प्लॉट विक्री देखील झाले आहेत. त्यामुळे एरव्ही इतर प्लॉटिंगधारकांवर गुन्हे दाखल करणारे महापालिका प्रशासन आता का गुन्हा दाखल करेना, असा सवाल उपस्थित होत आहे.

Sambhajinagar News
The Art of Living : 'द आर्ट ऑफ लिव्हिंग'तर्फे चंडी होम महोत्सवाचे आयोजन

शहरातील जाधववाडी मोंढ्यालगत असलेल्या सनी सेंटरच्या मागच्या बाजूस श्री राम मंदिर संस्थान बालाजी मठाची सुमारे ४१ एकर जागा आहे. गट नंबर १२४ आणि १२५ मधील ही जागा वर्ग २ च्या खिदमत मास संभाजीनगर महानगरपालिका छत्रपती संभाजीत मण्य प्रभावशीय मारत प्रकारात मोडते. सातबारामध्ये त्याबाबत नोंद देखील आहे.

यात एका सातबारामध्ये २१ एकर तर दुसऱ्यामध्ये २० एकर क्षेत्र दाखविण्यात आले आहे. या जागेवर अनेक वर्षांपासून बड्या व्यावसायिकांचा डोळा आहे. १९९१-९२ सालीच ही जागा त्यावेळच्या मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी १० सोयायट्यांना विक्री केली होती. त्यासंदर्भात न्यायालयात देखील याचिका दाखल झाली होती. त्यात देखील विक्रेत्यांनी ही जागा वर्ग २ खिदमत मास प्रकारातील असल्याची माहिती दडविली होती.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : गट-ब पदावरील तात्पुरत्या पदोन्नतीमुळे अनुकंपा नियुक्ती नाकारता येणार नाही

दरम्यान, शहरात अवैध प्लॉटिंग करणाऱ्या भूमाफियांविरोधात महापालिकेने कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. या कारवाईअंतर्गत महापालिकेच्या पथकाने श्री राम मंदिर मठाच्या जागेवरही बुलडोझर चालविला आहे. प्रत्यक्षात हे आदेश महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु, कारवाईनंतर अचानक पदाधिकाऱ्यांनीच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माघारी येण्याचे आदेश दिल्याची माहिती सध्या अधिक चर्चेत आहे.

त्यामुळेच मागील दोन आठवड्यांपासून या प्रकरणात केवळ दोन जणांचा शोध सुरू असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्यास महापालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. त्या दोघांची नावे अजूनही महापालिकेच्या पथकाला सापडलेली नाहीत. आतापर्यंत जेथे जेथे महापालिकेच्या पथकाने धडक मोहीम राबवून अवैध प्लॉटिंग निष्कासित केली. त्याप्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. परतु, देवाची जागा विक्री करणाऱ्यांनाच अभय दिला.

गुन्हा दाखल होणारच शहरात अवैधरीत्या प्लॉटिंग करून त्याची विक्री करणाऱ्या भूमाफियांविरोधात महापालिकेने धडक मोहीम सुरू केली आहे. कारवाई करून संबंधितांवर गुन्हे देखील दाखल करण्यात येत आहेत. श्री राम मंदिर ट्रस्ट प्रकरणात देखील गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. अद्याप का गुन्हा दाखल झाला नाही, याबाबत माहिती घेऊन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देणार आहे.
- अमोल येडगे, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news