Sambhajinagar News : रस्त्यावरील खड्ड्यात पांढऱ्या पट्ट्याचे काम

सा. बां. विभागामुळे कंत्राटदाराचे चांगभले, निधीची उधळपट्टी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : रस्त्यावरील खड्ड्यात पांढऱ्या पट्ट्याचे काम File Photo
Published on
Updated on

White stripes are being painted on the old road between Mukundwadi and Chikalthana without tarring it.

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जालना रोडवर मागील चार दिवसांपासून मुकुंदवाडी ते चिकलठाणादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्यांच्या पॅचवर्कसह पांढऱ्या पट्ट्यांचे काम सुरू केले आहे. विशेष म्हणजे जुन्या रस्त्यावर डांबरीकरण न करताच पांढऱ्या पट्ट्या मारण्यात येत असल्याने शासन निधीची उधळपट्टी का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

Sambhajinagar News
Vegetables Expensive : टोमॅटो-बटाटे वगळता सर्वच फळभाज्या शंभरीपार

शहराची लाईफलाईन असलेला जालना रोड हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम हे सा. बां. कडूनच करण्यात येते. मागील दहा वर्षांत या रस्त्यावर तीन ते चार वेळा डांबरीकरण करण्यात आले. परंतु तरीही रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे निर्माण होत आहेत. दोन वर्षांपूर्वीच हा रस्ता वुमेन्स ट्वेंटी परिषदेमुळे गुळगुळीत करण्यात आला होता. त्यानंतर लगेच सहा महिन्यांच्या आत रस्त्यांवर खड्डे पडणे सुरू झाले. यात सिडको उड्डाणपूल, क्रांती चौक उड्नणपुलावर मोठ्याप्रमाणात खड्डे निर्माण झाले होते.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने शासन निधीच्या उधळपट्टीला सुरुवात केली आहे. यात प्रामुख्याने मुकुंदवाडी ते केंब्रीज चौकादरम्यानच मोठ्याप्रमाणात अनावश्यक कामांवर खर्च केला जात आहे. रस्त्यावरील खड्डे बुजवणे आवश्यक होते. परंतु या रस्त्यासोबतच त्यावर नव्या रस्त्यासारखेच व्हाईट प‌ट्ट्याही मारण्यात येत आहेत. त्यामुळे या कामावर नागरिकांतून संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Sambhajinagar News
Devendra Fadnavis : संभाजीनगर आमच्या हृदयात; काहीच कमी पडू देणार नाही

खड्यातही पांढऱ्या पट्ट्या

या रस्त्यावर खड्डे बुजवण्यापूर्वीच त्यावर पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या. हा प्रकार पाहून वाहनध- ारकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. काहींनी तर ही शासन निधीची उधळपट्टी असल्याचे सांगितले.

टोल नाक्याच्या कंत्राटदाराचे काम

छत्रपती संभाजीनगर ते जालना या रस्त्यावर टोल वसुलीसाठी नियुक्त केलेल्या एजन्सीच्या वतीने जालना रोडवरील हे खड्डे बुजवणे आणि पांढऱ्या पट्ट्या कारण्याचे काम केले जात आहे, अशी माहिती काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news