Cotton Prices Increase : 'पांढऱ्या सोन्याला'ला पुन्हा झळाळी; कापूस प्रतिक्विंटल ९ हजार ४०० रुपयांवर !

आयात शुल्क माफीला मुदतवाढ देऊनही आवक घटल्याने दर वधारले
Cotton Prices Increase
Cotton Prices Increase : 'पांढऱ्या सोन्याला'ला पुन्हा झळाळी; कापूस प्रतिक्विंटल ९ हजार ४०० रुपयांवर !file photo
Published on: 
Updated on: 

'White gold' Cotton regains its luster; cotton reaches 9,400 rupees per quintal!

रमाकांत बन्सोड

गंगापूर : केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्क माफीला मुदतवाढ देऊनही देशांतर्गत बाजारपेठेत कापसाच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. दिवाळीपूर्वी प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपयांनी घसरलेला कापूस आता थेट ९ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे. दुसरीकडे, पावसाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाल्याने आणि भविष्यात प्रतिक्विंटल १० हजार रुपये भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवून ठेवल्याने बाजारपेठेतील आवक मंदावली आहे.

Cotton Prices Increase
Accident News : मुकुंदवाडी सिग्नलवर एसटीने वाहनांना उडविले

कापड उद्योगाच्या मागणीवरून केंद्र सरकारने १ जून २०२६ रोजी कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क हटवले होते. या निर्णयाची ३१ ऑक्टोबर रोजी संपणारी मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या आयात शुल्क माफीमुळे देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरावर मोठा दबाव निर्माण झाला होता. परिणामी, प्रतिक्विंटल ९ हजार २०० रुपयांवर असलेले दर घसरून ८ हजार ते ८ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. मात्र, दिवाळीनंतर बाजारातील चित्र पालटले असून दरात मोठी सुधारणा झाली आहे.

शेतकरी दरावर ठाम

कापसाचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असताना, आगामी काळात कापसाला प्रतिक्विंटल १० हजार रुपयांपर्यंत दर मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच आशेवर शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई न करता तो घरातच साठवून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक दरासाठी बळीराजा ठाम राहिल्याने येत्या काळात कापसाचे दर आणखी वधारण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Cotton Prices Increase
Jan Shatabdi Express : जनशताब्दी १ जानेवारीपासून एक्स्प्रेसच्या श्रेणीत धावणार

उत्पादनात घट आणि आवक मंदावली

गंगापूर तालुक्यात यंदा ४५ हजार ८३ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पीक जोमात असतानाच जुलै महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. सध्या बाजारात कापसाची आवक कमालीची घटली असल्याने दर कमी करण्याचे कोणतेही सबळ कारण व्यापाऱ्यांकडे उरलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.