Land Prices : खरंच वैजापुरात जमिनीचे भाव आहेत तरी काय ?

एका व्यवहारामुळे तालुकाभरात चर्चेला उधाण
Prices Hikes Of Land In Vaijapur
Land Prices : खरंच वैजापुरात जमिनीचे भाव आहेत तरी काय ?Pudhari File Photo
Published on
Updated on

What exactly are land prices in Vaijapur?

पुढारी इन्वेस्टिगेशन

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा वैजापूर शहरातील आणि शहराबाहेरील जमिनीचे भाव छत्रपती संभाजीनगरलाही मागे टाकल्याची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे. नगरपालिकेच्या हद्दीत तब्बल १० हजार रुपये प्रतिचौरस फूट आणि शहराबाहेरील जमिनीला चार कोटी रुपये प्रतिएकर दराने झालेल्या व्यवहारामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र खरेच वैजापूरमधील जमिनींचे बाजारभाव इतके वाढले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी 'पुढारी'ने केलेल्या इन्वेस्टिगेशनमध्ये काही वेगळेच वास्तव समोर आले आहे.

Prices Hikes Of Land In Vaijapur
Land price increase : वैजापुरात जमिनीचे भाव भिडले गगनाला

वैजापूर शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षांत जमिनींच्या किमतीत वाढ झाली असली तरी चर्चेत असलेला व्यवहार हा सर्वसाधारण बाजारभावाचे प्रतिनिधित्व करणारा नसून, अपवादात्मक स्वरूपाचा असल्याचे स्थानिक पातळीवरील माहितीवरून समोर येत आहे. समृद्धी महामार्ग, वाढत्या व्यावसायिक संधी आणि भविष्यातील विकासाच्या अपेक्षांमुळे वैजापूरकडे गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले जात आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की शहरातील किंवा तालुक्यातील सर्वच जमिनींना विक्रमी भाव मिळत आहेत.

व्यवहारातील स्थानिक जमीन जाणकारांच्या मते, वैजापूर शहरातील प्रमुख व्यापारी भागांमध्ये आणि भविष्यात विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ठिकाणी जमिनींच्या किमतीत वाढ झाली आहे.

Prices Hikes Of Land In Vaijapur
Renapur cattle market | बैल बाजार : दीड वर्षात अवघ्या दोन-अडीचशेच बैलांची विक्री

मात्र शहरातील बहुतांश भागांमध्ये आणि शहराबाहेरील कृषी व बिगर कृषी जमिनींचे व्यवहार अद्यापही सामान्य बाजारभावानुसारच होत आहेत. 'पुढारी'ने काही नागरिक, जमीन गुंतवणूकदार आणि व्यवहाराशी संबंधित व्यक्तींशी संवाद साधला असता, या व्यवहाराकडे सर्वसाधारण बाजारभाव म्हणून न पाहण्याचा सल्ला अनेकांनी दिला.

वैजापूर शहरातील एक प्रतिष्ठित व्यापारी म्हणाले, शहरात काही ठिकाणी जमिनीला चांगला भाव मिळत आहे. मात्र सर्वत्र दहा हजार रुपये प्रतिचौरस फूट दर आहे, असे म्हणणे योग्य नाही. या एका व्यवहारामुळे बाजारात मोठी चर्चा सुरू झाली आहे. जमीन खरेदी-विक्री क्षेत्राशी संबंधित असलेल्या एका गुंतवणूकदाराने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news