स्त्री जन्माचे स्वागत करा !

मनपा, जिल्हा रुग्णालयाच्या आयोजित कार्यशाळेत संदेश
sambhajinagar news
स्त्री जन्माचे स्वागत करा !file photo
Published on
Updated on

Welcome the birth of a girl!

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: स्त्री जन्माचे स्वागत करा, या विषयावर महानगरपालिका व जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेतून स्त्री-पुरुष समानतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे रविवारी (दि.१२) हा उपक्रम पार पडला.

sambhajinagar news
Sambhajinagar News : जिल्ह्यात १० हजार फेरफार प्रलंबित

महानगरपालिका व जिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्त्री जन्माचे स्वागत करा, या विषयावर रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर समीर राजुरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ व आयुक्त अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या नेतृत्वात ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी डॉ. सुधा कांकरिया यांनी पीसीपीएनडीटी व एमटीपी कायद्यांतर्गत स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंध, स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व आणि महिलांच्या - सशक्तीकरणाबाबत सखोल मार्गदर्शन केले, तर आरोग्य समिती सभापती डॉ. सुनीता सोळुंके, विविध वैद्यकीय अधिकारी तसेच आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

sambhajinagar news
राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात संभाजीनगरची घोडदौड

लिंग निदानाची माहिती देणाऱ्यास १ लाखाचे बक्षीस

गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ अंतर्गत शासनाची खबरी योजना कार्यान्वित आहे. बेकायदेशीर गर्भलिंग निदान किंवा गर्भपाताबाबत तक्रार नोंदवून त्यावर कारवाई यशस्वी झाल्यास तक्रारदारास १ लाख रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाते. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाते. तक्रार टोल-फ्री क्रमांक १८००२३३४४७५ / १०४, संकेतस्थळ किंवा लेखी स्वरूपात करता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news