Paithan News : श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक खर्डा किल्ल्याच्या पायथ्याशी स्वागत

पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहात श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी टाळ-मृदंगांच्या तालावर भजन करीत प्रस्थान करीत आहेत.
Paithan News
Paithan News : श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे ऐतिहासिक खर्डा किल्ल्याच्या पायथ्याशी स्वागतfile photo
Published on
Updated on

Welcome of Sreesanth Eknath Maharaj's palanquin ceremony at the bottom of the historic Kharda Fort

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यासाठी मोठ्या उत्साहात श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी टाळ-मृदंगांच्या तालावर भजन करीत प्रस्थान करीत आहेत. या पालखी सोहळ्याने आठवा मुक्काम मंगळवारी दिघोळ पंचक्रोशीत केला. नव्या मुक्कामासाठी पालखी सोहळा सकाळी दिघोळ येथील भाविकांचा निरोप घेऊन निघाला. मोहरी मार्गे बुधवारी (दि. १५) सायंकाळी ऐतिहासिक खर्डा पूर्वीचे शिवपट्टण किल्ल्याच्या पायथ्याशी नाथांचा पालखी सोहळा दाखल होताच परिसरातील भाविकांनी जल्लोषात स्वागत केले.

Paithan News
Paithan News : श्रीसंत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी उद्या प्रस्थान

घरांसमोर रांगोळी काढून नाथांच्या पादुकांवर पुष्पवृष्टी करून पंढरीला निघालेल्या वारकऱ्यांसह पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, अॅड. योगेश महाराज गोसावी पालखीवाले, रवी महाराज कुलकर्णी यांचे उत्साहात स्वागत झाले.

पालखी सोहळ्याला खर्डा येथे भाविकांच्या दर्शनासाठी मुक्कामाचा विसावा करण्यात आला. यावेळी हजारो भाविक वारकऱ्यांनी भानुदास एकनाथ जयघोष करून शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, असा अभंग गाऊन समाज आरती मोठ्या उत्साहात करण्यात आली. खर्डा, जामखेड प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांना मुक्कामासाठी ठिकठिकाणी मोठा डोम मंडप उभारून व्यवस्था केली. पालखी गुरुवारी (दि.१६) दहाव्या मुक्कामासाठी अंतरवाली, तिंत्रजमार्गे दांडेगाव या ठिकाणी दाखल होणार आहे.

Paithan News
Ashadhi Wari 2026 | शेगाव-पंढरपूर पालखीचे हट्टा येथे आगमन; "गण गण गणात बोते" जयघोषाने दुमदुमला परिसर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news