Paithan News : श्रीसंत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी उद्या प्रस्थान

वारकरी, भाविक, सेवेकरी महाराज पंढरपूरकडे मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज
paithan news
श्रीसंत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी उद्या प्रस्थानfile photo
Published on
Updated on

Departure tomorrow for Ashadhi Vari of Sreesanth Eknath Maharaj Paduka Palkhi ceremony

पैठण, पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर येथील आषाढी वारी सोहळ्यासाठी मानाचे स्थान असलेल्या श्रीसंत एकनाथ महाराज पादुका पालखी सोहळा मंगळवारी (दि.७) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. दरवर्षीप्रमाणे नित्यनियमाने वारी करणारे वारकरी भाविक सेवेकरी महाराज मंडळी पंढरपूरकडे मार्गक्रमण करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

paithan news
Jalna News : संत मुक्ताबाई रिंगण सोहळ्याने पारणे फिटले

आषाढी वारी सोहळ्यात शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या दिंडीला मानाचे स्थान आहे. पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मंगळवारी पंढरीकडे प्रस्थान होणार आहे. दिंडी छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव जिल्ह्यांतून पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पोहोचणार आहे.

सोहळ्याचा (पहिला) मुक्काम चनकवाडी (ता. पैठण), (दुसरा) हातगाव (ता. शेवगाव), (तिसरा) कुंडलपारगाव (भगवान गडाच्या पायथ्याशी), (चौथा) राक्षसभुवन (तांबे, ता. शिरूर कासार बीड), रायमोह (पाचवा) पाटोदा (सहावा) दिघोळ (सातवा), खर्डा (आठवा), दांडेगाव (नववा), अनाळे (दहावा), परांडा (अकरावा), बिटरगाव (बारावा), कुई (तेरावा), अरण (चौदावा), करंकब (पंधरावा), होळे (सोळावा), १७ व्या मुक्कामाच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त सोहळा दाखल होणार आहे. दरम्यान, पालखी सोहळा प्रमुख नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी पालखीवाले, ज्ञानेश महाराज गोसावी, अड. नाथवंशज योगेश महाराज गोसावी हे मंगळवारी दुपारी गावातील नाथांच्या वाड्यातून नाथांच्या पादुका पालखीत विराजमान करतील.

paithan news
काला दहीहंडी फोडून सांगता

नाथाच्या समाधी मंदिरात दुपारचा विसावा घेऊन पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या दर्शनासाठी हा पालखी सोहळा प्रस्थान स्थळावर काही वेळ थांबेल. सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर हजारो वारकरी भाविक भक्तांच्या उपस्थितीत पहिल्या मुक्कामाकडे प्रस्थान होणार आहे.

रिंगण सोहळा

पालखी सोहळ्याच्या प्रथेप्रमाणे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी पायी दिंडीद्वारे निघालेल्या हजारो वारकऱ्यांचा थकवा दूर करण्यासाठी वारकरी रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो. प्रथम रिंगण भगवान गडाच्या पायथ्याशी असलेल्या मिडसावंगी, दुसरे रिंगण पारगाव घुमरे, तिसरे रिंगण नांगरडोह, चौथे रिंगण कव्हेदंड, पाचवे उभे रिंगण व पादुका आरती संपन्न होते. या रिंगण सोहळ्यात सहभाग महाराज मंडळी, वारकरी भजन भारुड पावली खेळून भानुदास एकनाथ जय घोष करीत टाळ-मृदंगांच्या तालावर रिंगणातील विविध खेळांचा आनंद घेऊन आपला थकवा दूर करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news