Water supply : नव्या वाहिनीवरून आज ५ जलकुंभांत पाणी

जोडवाहिन्यांची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण : उर्वरित कामांनाही गती, आयुक्तांची माहिती
New water supply scheme
Water supply : नव्या वाहिनीवरून आज ५ जलकुंभांत पाणीpudhari photo
Published on
Updated on

Water supply to 5 reservoirs today via the new pipeline

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: नव्या पाणीपुरवठा योजनेतील १५०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरून पाच जलकुंभांमध्ये पाणी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सिडको एन-५ येथील दोन, तसेच हरसिद्धी, टीव्हीसेंटर, एन-७ आणि मिसारवाडी येथील जलकुंभांना जोडणाऱ्या जलवाहिन्यांची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि. १४) या पाच जलकुंभांमध्ये पाणी घेण्यात येणार असल्याची माहिती गुरुवारी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

New water supply scheme
MSRTC : ग्रुप बुकिंगला एसटी आकारणार ३० टक्के जादा भाडे

नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नक्षत्रवाडी येथून १५००, २००० आणि ११०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्या शहरात येतात. यापैकी १५०० मिमीची जलवाहिनी सिडको-हडकोमार्गे हर्सलपर्यंत जाते. पहिल्या टप्प्यात या जलवाहिनीतून शहराला पाणी देण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

मुख्य जलवाहिनीतून यापूर्वी सात जलकुंभांमध्ये पाणी घेण्यात आले होते. मात्र जलकुंभांना जोडणाऱ्या अंतर्गत जलवाहिन्यांच्या हायड्रॉलिक चाचण्या पूर्ण झाल्याशिवाय पाणीपुरवठा सुरू न करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या उपस्थितीत गुरुवारी नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात बैठक झाली.

New water supply scheme
Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाच्या मुख्य समन्वयकाला जिवे मारण्याची धमकी

आयुक्त अमोल येडगे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी, जीव्हीपीआर कंपनीचे प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत नव्या योजनेतील कामांचा आढावा घेण्यात आला. सिडको एन-५ येथील दोन, हरसिद्धी, टीव्हीसेंटर, एन-७ आणि मिसारवाडी येथील जलकुंभांमध्ये पाणी घेण्यास आता अडथळा नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, २००० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे स्कोरिंग केटली गार्डनजवळ, तर ११०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे स्कोरिंग सिद्धार्थ उद्यानाजवळील नाल्यात सुरू आहे.

मजूर वाढविण्याचे आदेश

अंतर्गत जलवाहिन्या आणि जलकुंभांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदार कंपनीला मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जलवाहिनीच्या कामावर शंभरपेक्षा अधिक मजूर कार्यरत आहेत. ही संख्या ३०० पर्यंत वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जलकुंभांच्या कामावर सध्या १६० मजूर असून, त्यातही वाढ करण्यास सांगण्यात आले आहे.

आज पाच जलकुंभांत पाणी

सिडको एन-५ येथील दोन, हरसिद्धी, टीव्हीसेंटर, एन-७आणि मिसारवाडी येथील जलकुंभांच्या जोडवाहिन्यांच्या चाचण्या पूर्ण झाल्याने आज शुक्रवारी या पाच जलकुंभांमध्ये पाणी घेण्यात येणार आहे. उर्वरित जलकुंभांच्या जोडवाहिन्यांच्या हायड्रॉलिक चाचण्या सुरू असून, त्या पूर्ण झाल्यानंतर संबंधित जलकुंभांमध्येही पाणी घेण्याची प्रक्रिया पुढे नेली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news