Maratha Kranti Morcha : मराठा क्रांती मोर्चाच्या मुख्य समन्वयकाला जिवे मारण्याची धमकी

फेसबुकवरील पोस्टवरून वाद; 'चाकू मारून तुझा गेम करतो'
 मराठा क्रांती मोर्चा
मराठा क्रांती मोर्चाfile photo
Published on
Updated on

Death threat to the chief coordinator of the Maratha Kranti Morcha

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समाजातील वाढत्या जातीयवादावर भाष्य करणारी फेसबुक पोस्ट टाकल्याच्या रागातून, 'मराठा क्रांती मोर्चा'चे मुख्य समन्वयक सुनील कोटकर यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. "तू पाटलाला विरोध का करतोस?" अशी विचारणा करत अज्ञाताने कोटकर यांना फोनवरून अश्लील शिवीगाळ केली आणि उद्याच शहरात येतो, तू जिथे असशील तिथे येऊन तुला चाकू मारून तुझा गेम करतो, अशी थेट धमकी दिली. या धक्कादायक प्रकारानंतर कोटकर यांच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 मराठा क्रांती मोर्चा
Grishneshwar Temple : घृष्णेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त बॅरिकेटिंगचे काम

फिर्यादी सुनील कोटकर हे गेल्या १८ वर्षांपासून समाजसेवेचे काम करतात. गुरुवारी (दि.१३) त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट टाकली होती. यात त्यांनी लिहिले होते की, "जय शिवराय, नेतृत्व हे दिशा दाखवणारे असले पाहिजे. समाजात तेढ निर्माण होत आहे, जातीयवाद वाढत आहे, याला जबाबदार कोण?" या पोस्टवरून एका समाजकंटकाला राग आला आणि त्याने थेट कोटकर यांना लक्ष्य केले.

सदर फेसबुक पोस्ट टाकल्यानंतर त्याच दिवशी दुपारी १:१२ वाजेच्या सुमारास कोटकर घरी असताना त्यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने काहीही ऐकून न घेता, तू पाटलाला विरोध का करतोस, पाटलाच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट का टाकतोस? असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. कोटकर यांनी त्या व्यक्तीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो संतापाच्या भरात काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता.

 मराठा क्रांती मोर्चा
Jayakwadi Dam | तिरंग्याच्या रोषणाईने उजळणार जायकवाडी धरण; देशभक्तीपर गीतांवर थिरकणार लेझर शो

उद्या शहरात येऊन तुझा गेम करतो

संतापलेल्या या अज्ञात व्यक्तीने फोनवर घाणेरड्या शिव्या देत थेट जीवावर उठण्याची धमकी दिली. "उद्या मी शहरात येतो, तू जिथे असशील तिथे येऊन तुला चाकू मारून तुझा गेम करतो," अशी थेट धमकी देऊन त्याने फोन कट केला. या धक्कादायक प्रकारानंतर कोटकर यांनी कॉलर आयडी अॅपवर तो नंबर तपासला असता, त्यावर 'अनिल पडुळ' असे नाव त्यांना दिसून आले. या धमकीमुळे आपल्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्याने कोटकर यांनी तात्काळ सायंकाळी चिकलठाणा पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news