Water Supply : पुन्हा आठव्या-नवव्या दिवशी पाणीपुरवठा

शहराचे वेळापत्रक कोलमडले, नऊशेवर १२ दिवसांपासून शटडाऊन सुरूच
Water Supply
Water Supply : पुन्हा आठव्या-नवव्या दिवशी पाणीपुरवठाFile Photo
Published on
Updated on

Water supply again on the eighth-ninth day

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या मुख्य जलवाहिनीवर आठ ठिकाणी जोडणी शिल्लक आहे. या कामासाठी मागील १२ दिवसांपासून ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर शटडाऊन घेण्यात आले आहे. परंतु त्यामुळे शहर पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून, शहराला सप्टेंबर महिन्यापासून सुरळीतपणे पाचव्या दिवशी होत असलेला पाणीपुरवठा पुन्हा आठव्या, नवव्या दिवसांवर गेला आहे. त्यामुळे नागरिकांतून पुन्हा संताप व्यक्त होत आहे.

Water Supply
Bribe Case : दौलताबाद ठाण्यातील महिला पोलिसाला २० हजारांची लाच घेताना पकडले

केंद्र सरकारच्या अमृत-२ योजन `तून २७४० कोटी रुपये खर्चुन नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३९ किलोमीटर अंतरात २५०० मिमी व्यासाच्या क्षमतेची मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवर हायड्रोलिक चाचण्या, व्हॉल्व्ह बसवण्यासह इतर कामांसाठी गॅप सोडण्यात आले होते.

यातील बहुतांश गॅप व्हॉल्व्ह बसवल्यानंतर जोडण्यात आले. परंतु त्यानंतर १२ ठिकाणी जलवाहिन्या एकमेकांशी जोडण्याचे काम जैसे थेच ठेवण्यात आले होते. नवीन पाणीपुरवठा योजन `तून शहराला वेळेत पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून पूर्ण क्षमतेने पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Water Supply
High Security Number Plate : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट : काऊंटडाऊन सुरू

दरम्यान, ९०० च्या जलवाहिनीसाठी फारोळ्यात उभारलेल्या नवीन जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण ऑगस्टमध्ये झाले. त्यानंतर सप्टेंबरपासून या जलवाहिनीतून शहराला वाढीव ३५ एमएलडी पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तेव्हापासून शहराचा पाणीप रवठा आठव्या दिवसांवरून ५ व्या दिवसावर आला.

दोन वेळा जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्यानंतरही पाणीपुरवठा ५ व्या दिवशीच सुरू राहिला. परंतु सध्या नव्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील गॅप जोडणीसाठी ९०० च्या जलवाहिनीवर घेण्यात आलेल्या शटडाऊनमुळे शहराचा पाणीपुरवठा पुन्हा आठव्या, नवव्या दिवसांवर गेला आहे.

कोणत्या जलकुंभाहून, केव्हा होतो पुरवठा

क्रांती चौक- ७ व्या दिवशी कोटला कॉलनी-७ व्या दिवशी विद्यापीठ ८ व्या दिवशी जुबलीपार्क - ८ व्या दिवशी जय विश्वभारती- ११ व्या दिवशी एन-५ (आर-१) ६ व्या दिवशी एन-५ (आर-२)-८ व्या दिवशी शिवाजीनगर- ७ व्या दिवशी

९०० चा शटडाऊन पुन्हा वाढला

९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर घेण्यात आलेला शटडाऊन १२ व्या दिवशी सुरूच आहे. आणखी चार दिवस हा शटडाऊन वाढविण्यात आला आहे. त्यामुळे शहराचा पाणीप-रवठा आणखी आठवडाभर विस्कळीत राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news