Water crisis : कन्नड तालुक्यात पाणी संकटाची चाहूल

मध्यम प्रकल्पांमध्ये ४६ ते ७६ टक्के पाणी शिल्लक, लघु प्रकल्पांची सरासरी ३०-३५ टक्क्यांवर
Water crisis
Water crisis : कन्नड तालुक्यात पाणी संकटाची चाहूलfile photo
Published on
Updated on

Water crisis looms in Kannada taluka

संजय मुचक

कन्नड : मार्च महिना सुरू होताच कडाक्याचे ऊन पडू लागल्याने तालुक्यातील जलसाठ्यांमध्ये वेगाने घट होत आहे. उपविभागीय जलसंपदा विभागाच्या ताज्या अहवालानुसार, तालुक्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये सरासरी पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला असून, येणाऱ्या उन्हाळ्यात काही गावांना पाणीटंचाईची तीव्रता जाणवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Water crisis
Sambhajinagar News : शहराची तहान भागवण्यासाठी मनपाची धडपड

कन्नड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तालुक्यातील महत्त्वाच्या मध्यम प्रकल्पांपैकी शिवना टाकळी धरणात ७०% अंबाडी धरणात सध्या ४६.५०%, अंजना पळशी ७६.९३% तर पूर्णा- नेवपूर प्रकल्पात ४९.९४% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे मध्यम प्रकल्पांची स्थिती समाधानकारक असली तरी वाढते वाष्पीभवन आणि पिण्याच्या पाण्याचा वाढता उपसा पाहता हे पाणी किती काळ टिकणार, यावरच तालुक्याचे गणित अवलंबून आहे. ?तालुक्यातील लघु प्रकल्पांची परिस्थिती मात्र अधिक गंभीर आहे.

Water crisis
गॅपमुळे नक्षत्रवाडीजवळ मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम अपूर्ण

तालुक्यातील २० लघु प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. लघु प्रकल्पांची एकूण सरासरी पाहता, पाणीसाठा केवळ ३० ते ३५ टक्क्यांच्या घरात आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी लागणारे पाणी आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न येत्या काळात गंभीर होऊ शकतो. प्रशासनाने आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन न केल्यास मे महिन्यात टँकरची धावपळ उडण्याची चिन्हे दिसत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news