Sambhajinagar Crime : वाळूजमध्ये दोन महिलांकडून १० किलो गांजा जप्त

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाची कारवाई; ६.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Waluj Ganja Seizure
गांजा जप्तीच्या कारवाईनंतर गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी.pudhari photo
Published on: 
Updated on: 

वाळूज : वाळूज परिसरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या दोन महिलांना अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. मंगळवारी (दि. २७) रात्री छत्रपती संभाजीनगर- अहिल्यानगर मार्गावरील हॉटेल योगराजजवळ ही कारवाई करण्यात आली. यावेळी १० किलो १८४ ग्रॅम गांजासदृश पदार्थ, मोबाईल आणि स्कूटी असा एकूण ६ लाख १९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुनीता सुखदेव पिंपळे (वय ३२) आणि कोमल सोमनाथ पवार (वय २२, दोघी रा. सातारा गाव, छत्रपती संभाजीनगर) अशी ताब्यात घेतलेल्या महिलांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिला आकाशी रंगाच्या स्कूटीवरून गांजा घेऊन वाळूज परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक उत्तरेश्वर मुंढे यांनी सहकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेऊन पंच आणि न्यायवैज्ञानिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत सापळा रचला. रात्री सव्वानऊच्या सुमारास संशयित महिला स्कूटीवरून येताना दिसताच पथकाने त्यांना थांबवून तपासणी केली.

Waluj Ganja Seizure
Sambhajinagar Municipal Corporation Revenue : गुंठेवारीतून मनपाच्या तिजोरीत १०० कोटी

महिला पोलिस अधिकाऱ्याने कायदेशीर तरतुदींची माहिती दिल्यानंतर दोघींची झडती घेण्यात आली. यावेळी सुनीता पिंपळे हिच्या स्कूटीवरील पिशवीत तपकिरी रंगाच्या पॅकिंगमधील पाच पाकिटे आढळली. न्यायवैज्ञानिक तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गांजासदृश पदार्थ असल्याचे सांगितले.

पॅकिंगसह त्याचे वजन १० किलो १८४ ग्रॅम भरले. दरम्यान, कोमल पवार हिच्या अंगझडतीत कोणताही अमली पदार्थ आढळला नसल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे सरताज पठाण यांनी वाळूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सुनीता पिंपळे, कोमल पवार आणि महेश गायकवाड या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक वैशाली गुळवे पुढील तपास करीत आहेत.

Waluj Ganja Seizure
Mumbai luxury home sales: मुंबईच्या आलिशान घरांचा बाजार तेजीत! सहा महिन्यांत ३२ हजार कोटींची विक्री

गांजाचा पुरवठादार कोण?

पोलिसांनी जप्त केलेल्या गांजासदृश पदार्थाची किंमत ५ लाख ९ हजार २०० रुपये, मोबाईलची किंमत १० हजार रुपये, तर स्कूटीची किंमत एक लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. या प्रकरणात गांजासदृश पदार्थ कुठून आणला, त्याचा पुरवठादार कोण आणि वाळूज परिसरात तो कोणाला विक्रीसाठी नेला जात होता, याचा तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news