Waluj Mahanagar chain snatching : वाळूज महानगरातून महिलेचे मिनी गंठण, पोत लांबविली

वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
Crime News
Crimepudhari
Published on
Updated on

वाळूज महानगर : एका दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी मुलीसोबत घराकडे जाणाऱ्या ४३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील पावणे दोन तोळ्याचे मिनी गंठण व साडे सहा ग्रॅम वजनाची पोत लांबविल्याची घटना सोमवारी सिडको वाळूज महानगरात घडली.

या विषयी अधिक माहिती अशी की, बजाजनगर येथील सीतानगरात राहणाऱ्या वंदना गायकवाड व त्यांची मुलगी साक्षी हे सोमवारी रात्री तिसगाव येथे रा हणाऱ्या त्यांच्या बहिणीला भेटून मोपेडवरून घराकडे येत होत्या. रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरातील हॉटेल कंदील जवळ एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्याने त्यांची दुचाकी मोपेडसमोर आडवी लावली.

Crime News
खाकी सुस्तावली अन् चोरटे सुसाट! जळगाव जिल्ह्यात तीन ठिकाणी डल्ला

दरम्यान दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या भामट्याने वंदना यांच्या गळ्यातील १६.७०० ग्रॅम वजनाचे मिनी गंठण व ६.५२९ ग्रॅम वजनाची पोत बळजबरीने हिसकावून त्यांना धक्का देऊन मोपेडवरून खाली पाडले.

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वंदना यांनी आरडाओरड केली. मात्र लोक जमा होईपर्यंत भामटे दुचाकीवरून मोहटादेवी मंदिराच्या दिशेने सुसाट वेगाने पसार झाले. या प्रकरणी वंदना गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Sangli News : पिस्तुलाच्या धाकाने अपहरण, जीवे मारण्याची धमकी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news