

Invitation to Italian industries to come to Sambhajinagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
इटलीच्या उद्योगांनी भारतात यावे आणि कंपन्या, कारखाने सुरू करावे, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटालियन उद्योगांना केले आहे. त्यांनी भारतात यावे म्हणून छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईजवळील दिघी येथे खास औद्योगिक वसाहती (इंडस्ट्रियल एन्कलेव्ह) निर्माण करून देण्याची तयारीही पीयूष गोयल यांनी दर्शविली असून, तसा प्रस्तावही इटलीला दिला आहे.
नुकतेच इटली दौऱ्यात पीयूष गोयल यांनी इटलीचे उपपंतप्रधान व परराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री अँटोनियो ताजानी यांच्यासोबत एका बैठकीत भारतातील औद्योगिक गुंतवणुकीच्या नव्या संधीबाबत म्हणाले, इटालियन कंपन्यांसाठी भारत सरकार होम अवे फॉम होम या संकल्पनेवर औद्योगिक वसाहती विकसित करणार आहे.
या वसाहतीत केवळ उद्योगधंदाच नव्हे तर इटालियन कर्मचा-यांसाठी आवश्यक सर्व सुविधा- इटालियन अभ्यासक्रमावर आधारित शाळा व महाविद्यालये, इटलीतील आरोग्य विमा योजनांना स्वीकारणारी हॉस्पिटल्स, तसेच एकत्रितपणे काम व निवास करण्यासाठी आधुनिक अधिष्छने यांचा समावेश असेल. त्यामुळे इटालियन कंपन्यांना आपण इटलीतच आहोत असे वाटेल, यासाठी त्यांनी इथल्या कंपन्यांनी भारतात यावे, असे आवाहन त्यांनी केले.
संभाजीनगरमध्ये ८ एकरांवरील औद्योगिक विस्तार राज्य सरकारने ऑरिक सिटीचा विस्तार सुमारे ८,००० एकरांपर्यंत करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, वात इटालियन कंपन्यांसाठी स्वतंत्र क्लस्टरची रचना केली जाणार आहे.