Verul rainfall : वेरूळ परिसरात समाधानकारक पाऊस; शेतकरी सुखावला

खरीप, रब्बी हंगामाला मोठा फायदा होणार; शेतकऱ्यांना आशा
Verul rainfall
वेरूळ परिसरात शनिवारी झालेल्या पावसामुळे बहरलेले कापूस पीक. (छाया : किरण महेर)
Published on
Updated on

वेरूळ: खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, पळसवाडी, आखतवाडा, चिंचोली, पिंपरी, गल्लेबोरगाव व कसाबखेडा परिसरात शनिवारी (दि. १२) दुपारी एक ते तीनच्या सुमारास समाधानकारक पाऊस झाला. सुमारे दोन तास झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावले असून, खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला. परिसरात कापूस, सोयाबीन, मका, तूर व बाजरीची पिके असून, त्यांच्या वाढीसाठी सध्या पावसाची आवश्यकता होती. पावसामुळे जमिनीत चांगला ओलावा निर्माण झाल्याने पिकांना फायदा होणार आहे.

Verul rainfall
MSRTC special bus service : एसटी गेली कोकणात, ग्रामीण प्रवासी खासगी वाहनांत !

वेरूळ येथील तेलवन तलाव, आजमपूर येथील चिमठा तलाव तसेच तिसगाव येथील काळापाणी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तलावांतील पाणीसाठ्यामुळे विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता असून, आगामी रब्बी हंगामासाठीही त्याचा फायदा होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.

वेरूळ परिसरातील फळबागांनाही या पावसाचा फायदा होणार आहे. मात्र, तालुक्यातील उत्तर धरण अद्याप कोरडेच असल्याने काही भागातील शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. तालुक्यात सर्वदूर दमदार पावसाची गरज असून, आगामी काळात चांगला पाऊस झाल्यास उर्वरित जलसाठे भरून खरीप व रब्बी हंगामाला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Verul rainfall
Chhatrapati Sambhajinagar rainfall : चाळीस दिवसांनंतर शहरात पाऊस

तीन तलाव तुडुंब

वेरूळ येथील तेलवन तलाव, आजमपूर येथील चिमठा तलाव आणि तिसगाव येथील काळापाणी तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे परिसरातील जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी रब्बी हंगामासाठीही या पाण्याचा फायदा होण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news