Sambhajinagar News : वेरूळ - देवगिरीच्या वैभवाची इस्त्रायल वाणिज्य दूतांना भुरळ

इस्रायलचे वाणिज्य दूत यानिव रेव्हाच यांनी सोमवारी वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर आणि देवगिरी किल्ल्याला भेट देत येथील ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाचे कौतुक केले.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : वेरूळ - देवगिरीच्या वैभवाची इस्त्रायल वाणिज्य दूतांना भुरळfile photo
Published on
Updated on

Verul – Israeli Consuls Captivated by the Grandeur of Devagiri

खुलताबाद : पुढारी वृत्तसेवा इस्रायलचे वाणिज्य दूत यानिव रेव्हाच यांनी सोमवारी वेरूळ लेणी, बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर आणि देवगिरी किल्ल्याला भेट देत येथील ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाचे कौतुक केले. इतिहास, स्थापत्यकला आणि अभेद्य रचना यांचा अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो. हा अप्रतिम वारसा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.

Sambhajinagar News
Bibi Ka Maqbara : बीबी का मकबऱ्याच्या ऐतिहासिक भिंतींचे संवर्धन सुरु

यानिव रेव्हाच यांनी सकाळी जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी कैलास मंदिर (लेणी क्रमांक १६) येथील कोरीव शिल्पकलेचे बारकाईने निरीक्षण केले. विश्वकर्मा लेणी (क्रमांक १०), बौद्ध लेणी (क्रमांक १२), इंद्रसभा, जगन्नाथ सभा आणि जैन लेणी यांनाही भेट देत येथील स्थापत्यवैभवाबद्दल माहिती जाणून घेतली.

यानंतर त्यांनी श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात जाऊन पंचामृत अभिषेक केला व दर्शन घेतले. मंदिरातील धार्मिक वातावरण आणि प्राचीन वास्तुशैलीने ते प्रभावित झाल्याचे त्यांनी सांगितले. दुपारच्या सत्रात त्यांनी ऐतिहासिक देवगिरी किल्ल्याची पाहणी केली. भारतमाता मंदिर, चांदमिनार, काळकोट, चिनी महल, रंगमहाल, मेंढा तोफ तसेच अभेद्य संरक्षण व्यवस्थेसाठी प्रसिद्ध असलेल्या अंधारी मार्गाची त्यांनी माहिती घेतली. किल्ल्याची संरक्षण रचना, भक्कम तटबंदी आणि ऐतिहासिक महत्त्व याबद्दल त्यांनी विशेष गौरवोद्वार काढले.

Sambhajinagar News
सातशे वर्षांपूर्वीची बारव मोजतेय शेवटच्या घटका

या दौऱ्यादरम्यान इतिहास अभ्यासक भरत जोशी यांनी त्यांना विविध स्थळांची सविस्तर माहिती दिली. वेरूळ लेणी आणि देवगिरी किल्ला हे भारताच्या समृद्ध इतिहासाचे जिवंत प्रतीक असल्याचे मत यानिव रेव्हाच यांनी व्यक्त केले.

यावेळी संरक्षक सहायक संजय रोहनकर, पोलीस निरीक्षक रेखा लोंढे, उपनिरीक्षक आयुब पठाण, बापू डोंबळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक रफिक पठाण, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर कोळी, खुशाल पाटील, महेश घुगे, शरद बचाव, एस. नीळ, योगेश जाधव आणि बाबासाहेब आढाव आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news