

Various programs held in the city on the occasion of Buddha Jayanti
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :
शहरातील विविध बुद्धविहारांत बुद्ध जयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.१) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक बुद्धविहारात वंदना, परित्राणपाठ, धम्मदेसना, खीरदानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
सिद्धार्थ उद्यानात दीपदान उत्सव
बुद्धिस्ट उपासक-उपासिका सोशल फाउंडेशनतर्फे बुद्ध जयंतीनिमित्त २५८८ दीपदान उत्सव सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे. सिद्धार्थ उद्यानातील तथागतांच्या पुतळ्यासमोर सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित या दीपदान उत्सवात दीप प्रज्वलनासह खीरदान कार्यक्रमही होणार असून, शहरातील भिक्खू-भिक्खूणी संघासह उपासक-उपासिका, बालक-बालिका मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येकाने दीप किंवा मेणबत्ती सोबत आणावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भिक्खू संघाच्या धम्मदेश-नेनंतर दीप प्रज्वलित करण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या आयोजनात फाऊंडेशनचे अध्यक्ष शरद जाधव यांच्यासह डॉ. प्रा. ऋषिकेश कांबळे, डॉ. प्रमोद दुधडे, के. बी. दिवेकर, इंजि. अशोक आनंदराव, दादाराव खंडागळे, सुनंदा खंडारे, पंडित नरवडे, स्मिता खेरनार, सिद्धार्थ बनसोडे, राजाभाऊ उघडे आदींचा सहभाग आहे.
रमानगर येथे धम्म पहाटचे आयोजन
दामा डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन हेल्थ केयर फाऊंडेशन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध पौर्णिमेनिमित धम्म पहाटचे आयोजन ३ मे रोजी रमानगर येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्धघाटक भंते प्रा. डॉ. चंदबोधी हे करणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद दुथडे राहण-ारआहेत. स्वागताध्यक्ष डॉ. आर. जी. नरवडे हे आहेत. प्रमुख पाहुणे अनिल साबळे, डॉ. बी. एन. हिवाळे हे आहेत. धम्म पहाटमध्ये गायक गणेश चंदनशिवे, भीम गायक अजय देहाडे, कुणाल वराळे, राजश्री खरात, पंचशीला भालेराव, सलोनी जुंबडे, अॅड. संजय घागरे यांचा बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम होणार आहे.