Sambhajinagar civic polls : पहिल्याच मनपा निवडणुकीत वंचितचे चार शिलेदार जिंकले

अनेक मुरब्बी उमेदवारांना पहिल्याच प्रयत्नात घरचा रस्ता दाखवला
Sambhajinagar civic polls
वंचित बहुजन आघाडीच्या विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र परिसरात जल्लोष केला.pudhari photo
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या वंचित बहुजन आघाडीने मनपाच्या पहिल्याच निवडणुकीत प्रभाग तीनमध्ये चमक दाखवत चार शिलेदार जिंकून आणले.

या प्रभागातील अनेक मुरब्बी उमेदवारांना पहिल्याच प्रयत्नात विरोधकांना घरचा रस्ता दाखवला आहे. यापूर्वी अमित भुईगळ यांनी भारिपच्या वतीने निवडणूक लढवून मैदान मारले होते. त्याचबरोबर अफसर खान यांनी काँग््रेासकडून मैदान मारलेले होते. दरम्यान, दोन महिला उमेदवार या नवीन असूनही मैदान मारण्यात यशस्वी झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीची ही महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक आहे.यात त्यांनी दमदार यश मिळविले.

Sambhajinagar civic polls
VVMC election results : वसई - विरारमध्ये बविआने गड राखला

या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तीनचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित सुधाकर भुईगळ (अ), जरीना जावेद कुरेशी (ब), करुणा मेघानंद जाधव (क) आणि अफसर खान यासीन खान (ड) या चार उमेदवारांनी दिग्गजांना मागे सारत निवडणूक जिंकली. दरम्यान, या विजयानंतर कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साही वातावरण पहावयास मिळाले.

Sambhajinagar civic polls
Thane municipal election results : ठाण्यात भोईर कुटुंबातील चार तर दोन दांम्पत्यांसह माय लेक विजयी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news