Chhatrapati Sambhaji Nagar Politics| वैजापूरात राजकीय उलथापालथ?

आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली अन्नदाते कुटुंबाची भेट
Chhatrapati Sambhaji Nagar Politics
आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली अन्नदाते कुटुंबाची भेट Pudhari Photo
Published on
Updated on

नितीन थोरात

वैजापूर : तालुक्यात राजकारणातली मोठे नाव समजले जाणारे अन्नदाते कुटुंबाची निवासस्थानी जाऊन आमदार सतीश चव्हाण यांनी दिलेली सदिच्छा भेट आता चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीदरम्यान वैजापूरच्या माजी नगराध्यक्षा आनंदीबाई अन्नदाते, डॉ.अमोल अन्नदाते व डॉ. अभिजित अन्नदाते यांच्याशी विविध सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाली. परंतु, या मागे केवळ सौजन्य की राजकीय समीकरणे दडलेली आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आनंदीबाई अन्नदाते यांची राजकीय पार्श्वभूमी वैजापूरचे राजकारणात खूप महत्त्वाचे ठरली आहे. त्या नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा असून मराठवाड्याला राजकारणातल्या चळवळीतील मोठं नाव मानल्या जातात. त्यांच्या रूपाने त्यांच्या नेतृत्वात महिलांचे मोठे आंदोलन मराठवाड्यात झाले आहे. त्यांचा सामाजिक संपर्क आणि स्थानिक राजकारणातील प्रभाव आजही ठळक असून. मराठवाड्याच्या राजकारणात कडवट शिवसैनिक नेत्या असा ठसा आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांच्या एकनिष्ठ नेत्या म्हणून ओळखल्या जातात. चळवळीतील सक्रियता आणि कार्यकर्त्यांवरील पकड यामुळे त्यांच्या राजकीय उपस्थितीला विशेष महत्त्व आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाला तालुक्यात पक्षातील इनकमिंगची चर्चा सुरू असताना, आमदार चव्हाण यांनी अन्नदाते कुटुंबाची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Politics
Chhatrapati Sambhaji Nagar Political News : राणेंना अंगावर घेणाऱ्या महाजनांची दानवेंनी घेतली भेट

डॉ. अन्नदाते यांचा नवा चेहरा अन अभ्यासक दृष्टिकोन!

आंदतीताई यांचे सुपुत्र डॉ. अमोल अन्नदाते हे आरोग्यवारी मुळे तालुक्यासह राज्यात चर्चेत आहे . राजकीय क्षेत्रातील विश्लेषक म्हणून देखील ते ओळखले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून ते समाजकारण, आरोग्यविषयक उपक्रम आणि राजकीय समीक्षणांमुळे चर्चेत राहिले आहेत. स्थानिक राजकारणातील नव्या पिढीतील अभ्यासक चेहरा म्हणून त्यांचेकडे बघितले जाते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पार्श्वभूमीवर ते कुठल्या पक्षात पक्ष प्रवेश करतात का हे पाहणे महत्त्वाच असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news