Vaijapur News : कांदा व्यापाऱ्याची ३० लाखांची फसवणूक

महिला कांदा व्यापाऱ्याची एकाने तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Vaijapur News
Vaijapur News : कांदा व्यापाऱ्याची ३० लाखांची फसवणूक(File Photo)
Published on
Updated on

Vaijapur Onion trader cheated of Rs. 30 lakhs

वैजापूर, पुढारी वृत्तसेवा महिला कांदा व्यापाऱ्याची एकाने तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोहम्मद फजल पाशा (कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.

Vaijapur News
Parbhani News : गॅस रिफिलिंग, सुगंधी तंबाखू कारखान्यावर छापा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील तृप्ती दीपक वावरे या मागील तीन वर्षांपासून वैजापूर कांदा मार्केट येथे कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. यासाठी त्यांच्याकडे वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा अधिकृत परवाना आहे. याशिवाय त्यांचा अंदरसुल येथेही कांदा खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून, त्यांच्या मुलाचा वैजापूर येथे वजन काटा आहे.

मागील वर्षी २५ ऑगस्टला त्यांच्याकडे कर्नाटक येथील मोहम्मद फजल पाशा आला. सुरुवातीला त्याने त्यांच्याकडून अडीचशे क्विटल कांदा खरेदी करून त्यांना तीन लाख ३१ हजार ४७० रुपये अदा केले. यानंतर त्याने वावरे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी करून वेळोवेळी पैसे अदा करून त्यांचा विश्वास संपादन केला.

Vaijapur News
Jalna News : व्यापाऱ्यास लुटणारी टोळी जेरबंद

यानंतर त्याने २५ नोव्हेंबर २०२५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत वावरे यांच्याकडून कांदा खरेदी केला. या काळात त्याने ३० लाख ४१ हजार १७४ रुपये बाकी ठेवले. दरम्यान बाकी असलेल्या पैशांसाठी तृप्ती वावरे यांनी त्याला फोनवर संपर्क केला. मात्र त्यांना पैसे मिळाले नाही. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news