Sambhajinagar News : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे बुजवा

सभापतींचे मनपा प्रशासनाला निर्देश, स्थायी समितीत सदस्यांनी व्यक्त केला संताप
Sambhajinagar News
Sambhajinagar News : शहरातील प्रमुख रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे बुजवाfile photo
Published on
Updated on

Fill the deadly potholes on the city's major roads

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पैठण रोड असो की, अंतर्गत प्रमुख रस्ते असो, प्रत्येक रस्त्यावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी जलवाहिन्यांच्या कामामुळे तर काही ठिकाणी गॅस वाहिन्या आणि ड्रेनेज वाहिन्यांमुळे रस्ते खड्डेमय झाले असून, पावसामुळे अपघात होत आहेत, असे म्हणत सदस्यांनी स्थायी समिती समेत संताप व्यक्त केला. त्यावर तातडीने खड्डे बुजविण्यात यावेत, असे आदेश सभापती अनिल मकरिये यांनी दिले.

Sambhajinagar News
E-KYC : कर्जमुक्तीचा लाभ घ्यायचा? ई-केवायसी तातडीने पूर्ण करा : जिल्हाधिकारी

मान्सूनला सुरुवात होण्याअगोदरच शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने करणे आवश्यक होते, परंतु यात काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मोडतात.

त्यामुळे या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम त्याच विभागाने करणे आवश्यक होते. असे असतानाही महापालिका प्रशासनालाच धारेवर धरले जाते. गुरुवारी झालेल्या स्थायी समिती समेत पुन्हा संतप्त सदस्यांनी महापालिका अधिकाऱ्यांनाच धारेवर धरले. महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चुन शहरातील सर्वच प्रमुख अणि अंतर्गत रस्ते गुळगुळीत केले, परंतु मागील दीड वर्षात नवीन पाणीपुरवठा योजना, गॅस व ड्रेनेजलाईनच्या योजनेने रस्ते पुन्हा खड्डेमय केले आहेत. विशेष म्हणजे या तिन्ही योजनांच्या करारानुसार रस्ते फोडल्यानंतर ते पूर्ववत करणे बंधनकारक आहे.

Sambhajinagar News
Sanjay Shirsat : घरकुलाच्या हप्त्यातून उधाऱ्या फेडू नका

तरीही या तिन्ही योजनांच्या कंत्राटदारांकडून फोडलेले रस्ते दुरुस्त करून देण्यात आलेले नाहीत. आता पावसाळा सुरू झाल्याने अनेक मुख्य रस्ते, चौक खड्ड्यांमुळे धोकादायक बनले आहेत. चिखलामुळे दुचाकीस्वार घसरून पडून जखमी होत आहेत. त्याचा संताप गुरुवारी स्थायी समिती सभेत सदस्यांनी व्यक्त केला. राजगौरव वानखेडे म्हणाले की, गेल्या स्थायी समिती सभेतच अधिकाऱ्यांनी तीन दिवसांत खड्डे बुजविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.

त्यावर शहर अभियंता संजय कोंबडे यांनी खुलासा करताना सांगितले की, सर्वसाधारण सभेत २९ लाखांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार तीन दिवस मुदतीची निविदा काढली आहे. ही निविदा अंतिम होताच मुख्य रस्ते व ज्याठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते, तेथील दुरुस्तीचे काम करण्यात येईल, असे सांगितले.

पैठण रोडवर हाल :

पैठण रोड परिसरात पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी खोदण्यात आलेला रस्ता तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश मागील स्थायी समिती सभेतच देण्यात आले होते. त्यानंतरही अद्याप खड्डे जैसे थेच, एकही खड्डा बुजविण्यात आला नसल्याचे नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिले. त्यासोबतच सातारा-देवळाईतील काही रस्ते आणि सोयायट्यांमध्ये अद्यापही पथदिवे बसविण्यात आले नसून, ते तातडीने बसविण्यात यावेत, अशी मागणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news