Unseasonal Rain : अवकाळीने मराठवाड्याला झोडपले

संभाजीनगरसह लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत सरी: अनेक भागांत गारपीट
Unseasonal Rain
Unseasonal Rain : अवकाळीने मराठवाड्याला झोडपलेfile photo
Published on
Updated on

Unseasonal rains have battered Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यात बुधवारी (दि.१८) अवकाळी पावसाने जोरदार हजेरी छत्रपती लावत शेतकरी व नागरिकांची धावपळ उडवली. संभाजीनगरसह लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या, तर काही भागांत गारपीटही झाली.

Unseasonal Rain
Unseasonal Rain : नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, परभणीला अवकाळीचा फटका

संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड, वैजापूर, गंगापूर आणि वाळूज परिसरात दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहू लागले. त्यानंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. कन्नड तालुक्यातील लिबांजी चिंचोली येथे गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांच्या आसपास पोहोचल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्री उष्णतेचा त्रास वाढला होता. मात्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांतील अनेक भागांत ढगांच्या गटगटासह वादळी वारे वाहून जोरदार पाऊस झाला.

Unseasonal Rain
Anti-Encroachment Campaign : जि.प., महापौर निवडणुकीनंतर शहरात पाडापाडीची जम्बो मोहीम

यावेळी अनेक भागांत मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी शेतकऱ्यांसाठी हा दिलासा न ठरता चिंतेचे कारण ठरला आहे. सध्या गहू, हरभरा आणि इतर रब्बी पिके काढणीच्या टप्प्यावर असताना या अवकाळी पावसाने मोठा फटका बसला आहे.

शेतात कापणीसाठी तयार ठेवलेले पीक भिजल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी पडल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शहरातही जोरदार पाऊस

छत्रपती संभाजीनगर शहरात रात्री दहा वाजेच्या सुमारास वादळी वारा, विजांच्या कडकडाटात शहरातील काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. यावेळी ज्युबली पार्क, घाटी, मिलकार्नर, समर्थनगरसह क्रांती चौक आणि उस्मानपुरा भागात गारपिटीला सुरुवात झाली. तर जालना रोड, सिडको, हडको, चिकलठाणा भागात वादळी वार्यासह जारेदार पाऊस पडला. यासह शिवाजीनगर, पुंडलिकनगर, सातारा-दे-वळाई भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news