Unseasonal Rain : नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, परभणीला अवकाळीचा फटका

अनेक ठिकाणी रब्बी पिके आडवी, फळबागांचेही मोठे नुकसान
Unseasonal rain in Sambhajinagar
नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, परभणीला अवकाळीचा फटकाfile photo
Published on
Updated on

Nanded, Latur, Beed, Hingoli, Parbhani hit by unseasonal rain

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मराठवाड्यातील नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्याला सोमवारी गारपीट, अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागला. त्यामुळे रब्बीचे मोठे नुकसान झाले. नैऋत्य बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत विस्तार-लेल्या द्रोणीय स्थितीमुळे राज्याच्या विविध भागांत मध्यरात्रीपासून अवकाळीने हजेरी लावली.

Unseasonal rain in Sambhajinagar
Car Accident : कार कालव्यात कोसळली; तिघे बेपत्ता

नांदेड, देगलूर, मुखेड, कंधार, नायगाव, बिलोली, उमरी, माहुर, हिमायतनगर, भोकर अशा दहा तालुक्यात दुपारी पाऊस पडला. चार ते पाचच्या दरम्यान झालेल्या पावसामुळे पिकांची हानीझाली. जिल्ह्यात अन्य काही भागात ढगाळ वातावरण, गार बारे होते. त्यामुळे उकाड्यापासून काही वेळ नागरिकांची सुटका झाली खरी, पण पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतामधील पिके जागेवर आडवी झाली. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पुढील आणखी काही दिवस अवकाळी पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. उमरखेड तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. परिणामी ७५ टक्के पिकांचे नुकसान झाले.

लातूर शहर व जिल्ह्यात पावसामुळे राशीला आलेली गहू, हरभरा, ज्वारी भिजली, अनेकशिवारांतील ज्वारी, गव्हाचे पिक वादळाने जमीनदोस्त झाले. आंबा, द्राक्ष बांगाना या आपत्तीचा मोठा फटका बसला असून तातडीने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मानसिक आधार द्यावा अशी मागणी होत आहे. लातूर शहरात सोमवारी मध्यरात्री दोन ते तीन तास पाऊस झाला. रेणापूर शहरासह तालुक्यातील खरोळा, पोहरेगाव, समसापूर, कोळगाव, राजेवाडी, नेहरूनगर, सुमठाणा यासह अनेक गावांमध्ये वादळी अवकाळी पाऊसव गारपीट झाली. यात ज्वारीचे पिक व ऊसाचे फड आडवे झाले.

Unseasonal rain in Sambhajinagar
पदोन्नतीसाठी टीईटी नसलेल्या शिक्षकांचा विचार करता येणार नाही

बऱ्याच ठिकाणी वादळामुळे झाडे अन्मळून पडली. राशीला आलेला गहू, हरभरा भिजला द्राक्ष, कलिंगडाचे मोठे नुकसान झाले. उदगीर तालुक्यातील लोणी, तोंडार, कुमठा या गावांस या आपत्तीचा मोठा फटका बसला.

शेतीचे नुकसान झाले, निलंगा, जळकोट, अहमदपूर, चाकूर तालुक्यात काही गावांत हलकासा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात दुपारच्या सुमारास अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. विशेषतः धारूर, परळी, माजलगाव आणि पाटोदा तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर अधिक होता. परभणीतही पूर्णा शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले होते. सोमवारी दुपारनंतर बादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. सायंकाळपर्यंत आकाशात ढग दाटून राहिल्याने रात्री उशिरापर्यंत पावसाची शक्यता वर्तविण्यात येत होती.

नांदेड, देगलूर, मुखेड, कंधार, नायगाव, बिलोली, उमरी, माहूर, हिमायतनगर, भोकर अशा दहा तालुक्यात दुपारी पाऊस पडला. लातूर शहर व जिल्ह्यात पावसामुळे राशीला आलेली गहू, हरभरा, ज्वारी भिजली, अनेकशिवारांतील ज्वारी, गव्हाचे पिक वादळाने जमीनदोस्त बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. धारूर, परळी, माजलगाव आणि पाटोदा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. परभणीतही पूर्णा शहर परिसरात पावसाने हजेरी लावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news