

Unseasonal rains cause huge losses to farmers' cotton, maize and fodder crops
पिशोर, पुढारी वृत्तसेवा : कन्नड तालुक्यातील पिशोर व नाचनवेल परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी वर्गाची दिवाळी अक्षरशः शेतीकामातच गेली आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीने तयार केलेल्या कापूस, मका, सोयाबीन तसेच जनावरांच्या चारापिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतांमधील उभे पीक पूर्णतः नष्ट झाले आहे.
दिवाळीच्या सणाच्या काळात शेतकरीवर्ग आनंद साजरा करण्याऐ वजी शेतातील पाण्याचा निचरा करण्यात, कोरडी झालेली पिके वाचवण्याच्या प्रयत्नात मग्न आहे. मदिवाळी सण गेला पण शेतकऱ्यांच्या घरात दिवा लावायलाही पैसा नाहीफ अशी स्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत शासनाने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी अनेक ठिकाणी पंचनामे सुरूच झाले नाहीत.
ज्याठिकाणी पंचनामे झाले आहेत, तिथेही मदतीचा एक रुपया अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आणि नाराजीचे वातावरण आहे. शासनाच्या नुकसानीच्या भरपाईबाबतच्या घोषणा फक्त कागदावरच राहिल्या असून मजाहिरातीत मदत, वास्तवात उपेक्षाफ असे चित्र निर्माण झाले आहे. पिशोर, नाचनवेल चिंचोली, परिसरातील शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तत्काळ सर्वेक्षण करून प्रति हेक्टर नुकसान भरपाई थेट खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे.
कर्ज, खत, बियाणे यासाठी कर्जबाजारी झालो. आता अवकाळी पावसाने पिकेच नष्ट झाली. शासन फक्त दिलासा देतंय, पण हातात काहीच मिळत नाही, फ्फ असे एका शेतकऱ्याने सांगितले.