

Unnatural torture of a 13-year-old boy at knifepoint
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपीने १३ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी (दि.३१) रात्री दहा वाजेच्या सुमारास जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. शेख वसीम शेख अजीम (२०, रा. बायजीपुरा) असे आर-ोपीचे नाव असून, त्याला अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दिली. दरम्यान, आरोपी वसीमवर चेन स्नॅचिंगचा यापूर्वी एक गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४४ वर्षीय महिलेचा १३ वर्षीय मुलगा हा किराणा दुकानाला सामान घेण्यासाठी निघाला होता. रस्त्यात जाताना त्याला आरोपी वसीमने हाताला धरून एका घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तिथे त्याला चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक अत्याचार केला. हा प्रकार कुटुंबीयांना कळताच जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. बीएनएस कलम ६४, ३५१ (२), ३५१ (३), ४, ८, १२ पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी वसीमला अटक केली. अधिक तपास उपनिरीक्षक गणेश माने करत आहेत.