Marathwada University Logo Misuse : विद्यापीठाची ठेकेदाराला ५० लाखांची नोटीस

पुढारी इफेक्ट : तब्बल महिनाभरानंतर प्रशासनाला जाग
Marathwada University Logo Misuse
Marathwada University pudhari photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : विद्यापीठाने आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था (धुळे) यांच्याकडे कुशल कामगारांची मागणी केली होती. त्यानुसार ठेकेदाराने १०० कुशल कामगारांची भरती प्रक्रिया रावबण्यात जाहिरातीत विद्यापीठाचे नाव व लोगोचा वापर केला. हे वृत्त दैनिक पुढारीने ३० सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित केले.

याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने १ ऑक्टोबर रोजी ठेकेदाराला विना परवाना नाव व लोगो वापरल्याने ५० लाख नुकसान भरपाई व इतर कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. दरम्यान जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला जाग आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Marathwada University Logo Misuse
Farmer Deaths Marathwada : मराठवाड्यात आणखी पाच शेतकऱ्यांनी जीवन संपवले

विद्यापीठाने नुकतीच धुळे येथील आस्था स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या ठेकेदाराला १०० कुशल कामगार पुरवण्याची मान्यता दिली आहे. यानंतर ठेकेदाराने विद्यापीठाचा लोगो वापरून अधिकृत वाटेल अशा स्वरूपाची जाहिरात १ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली. या नंतर या संस्थेने उमेदवारांचे अर्ज मागवले. त्यांच्या परीक्षा विद्यापीठ परिसरात पार पडल्या. तरीही प्रशासनाला जाहिरातीत आपले नाव व लोगोचा वापर संस्थेने केल्याचे निदर्शनास कसे आले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान याबाबत दैनिक पुढारीने वृत्त प्रकाशित करताच मात्र प्रशासनाला जाग आणि तात्काळ ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली. तब्बल महिनाभर प्रशासनाने याकडे डोळेझाक का केली यावर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Marathwada University Logo Misuse
Kopardi Case: कोपर्डी प्रकरणाला नवा टप्पा; मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींची घटनास्थळी पाहणी

विद्यापीठाची परवानगी न घेता नाव आणि लोगोचा वापर केल्याने धुळे येथील संस्थेला रीतसर नोटीस पाठवली आहे. संबंधित संस्थेकडून दिलेल्या कालावधीत उत्तर आल्यानंतर प्रशासनाकडून पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे.

डॉ. संजय कवडे, कुलसचिव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news