Sambhajinagar News : प्यासा वाईन शॉपच्या पायऱ्याखालच्या अनधिकृत बारला अखेर ठोकले टाळे

पत्रे टाकून उभारलेल्या डोलाऱ्याकडे महापालिकेचे बुलडोझर फिरकेना
Sambhajinagar News
Sambhajinagar News : प्यासा वाईन शॉपच्या पायऱ्याखालच्या अनधिकृत बारला अखेर ठोकले टाळेFile Photo
Published on
Updated on

Unauthorized bar under the stairs of Pyaasa Wine Shop sealed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

टीव्हीसेंटर भागातील प्यासा वाईन शॉपच्या पायऱ्याखाली तळीरामांसाठी थाटलेल्या अनधिकृत बारचा प्रकार गुरुवारी (दि.१७) दैनिक पुढारीने समोर आणताच पोलिसांनी त्याला टाळे ठोकले आहे. वाईन शॉपवरून पार्सल घेऊन दारुडे पायऱ्यांच्या खाली बाकडे, खुर्च्छा, चकणा, पाण्याची व्यवस्था असल्याने बिनधास्तपणे बसत होते.

Sambhajinagar News
Sambhajinagar Political News : भुमरेंच्या ड्रायव्हरला आणखी ३५० कोटींचे बक्षीस, इम्तियाज जलील यांचा आरोप

महिलांची आणि मुलींची वर्दळ असलेल्या रस्त्यालगत असलेली ही अघोषित मधुशाला नागरिकांच्या जिव्हारी लागली होती. दरम्यान, रस्ता आणि पायऱ्यांच्या मधोमध जागेत अचानक पत्रे टाकून डोलारा उभा केलेला आहे. दुसरीकडे मनपा अतिक्रमित घरावर बुलडोझर फिरवत असताना त्यांना हा अनधिकृत बार का दिसत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुठे गेले मनपाचे बुलडोझर, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

शहरात वाईन शॉप, देशी दारू दुकानांच्या बाहेर तळीरामांसाठी ओपन बार सुरू आहे. सिडको बसस्थानकाजवळच गोल्डन पिकॉक वाईन शॉपवर पार्सल घेऊन समोरच ग्रीन बेल्टमध्ये दुचाकीवर ग्लास, बाटली ठेवून बिनधास्तपणे दारू ढोसत असतात. त्याशिवाय सिडको उड्डाणपुलाच्या बाजूच्या सर्व्हिस रोड, रामगिरी हॉटेलच्या इमारतीच्या खालील भागातही तळीराम उघड्यावरच बाटल्या घेऊन बसलेले दिसतात.

Sambhajinagar News
संभाजीनगरात अतिरिक्त वाळू उत्खनन प्रकरणात ५६ कोटी ६८ लाखांचा दंड, जीवन प्राधिकरणचे अधिकारी निलंबित

काही भागात शाळा, क्लासेसच्या परिसरातच दारूची काही दुकाने आहेत. अनेक रस्ते, मैदाने तळीरामांसाठी मधुशाला बनले ओपन बारवर पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नाही. त्यामुळे वाईन शॉपच्या परिसरातील रस्त्यावर तळीरामांचा वावर अधिक वाढत असल्याचे दिसते.

तर त्यांना लाठीचा प्रसादच : पोलिस उपायुक्त

प्यासा वाईन शॉपच्या खाली पत्रे, गेट बसवून आतमध्ये टेबल, खुर्चा लावून सोय केलेली होती. हा प्रकार समजताच त्याच्यावर तात्कळ कारवाई केली आहे. गेटला टाळे लावले असून, वाईन शॉप चालकाला कडक कारवाईचा इशारा दिला आहे. पुन्हा त्याचे कुलूप उघडणार नाही. रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, मुलींची सुरक्षा आमच्यासाठी सर्वप्रथम आहे. त्यामुळे यापुढे वाईन शॉपच्या बाहेर कोणीही दारू पिताना दिसले तर त्यांना लाठीचा प्रसादच दिला जाईल.
प्रशांत स्वामी, पोलिस उपायुक्त परिमंडळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news