Uday Samant : एमआयडीसीसाठी सरकारी भावाप्रमाणे जमिनी देण्यास शेतकऱ्यांना राजी करा

मंत्री सामंत यांचे प्रतिपादन; शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा
Uday Samant
Uday SamantPudhari
Published on
Updated on

Uday Samant: Persuade farmers to provide land for MIDC at government rates

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात एमआयडीसी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१७ मध्येच घेतला होता. मात्र, २०१७ ते २०२६ या नऊ वर्षांच्या काळात ही एमआयडीसी होऊ शकली नाही एमआयडीसी हवी असेल, तर शेतकऱ्यांना सरकारी भावाने जमिनी देण्यास राजी करा, एमआयडीसी देण्याची जबाबदारी माझी, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे दिले.

Uday Samant
Ajit Pawar death : जिल्हावासीयांच्या आठवणीतील अजितदादा नेत्यांचे अश्रू अनावर, जिल्ह्यावर दुखवटा

शहरातील एका खासगी मंगल कार्यालयात शुक्रवारी (दी. २२) शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना उद्योगमंत्री सामंत बोलत होते. व्यासपीठावर अल्पसंख्याक विकास मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार, छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार रमेश बोरनारे, प्रकाश महाजन, माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, माजी आमदार अण्णासाहेब माने आदींची प्रमुख उपस्थिती होती.

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, की ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी १०० टक्के ठामपणे उभा आहे. पक्षाचा बूथप्रमुख हा संघटनेचा खऱ्या अर्थाने कणा असतो. त्यामुळे जिल्हाप्रमुखांनी प्रत्येक बूथप्रमुखाचा योग्य सन्मान राखला पाहिजे, तरच पक्ष संघटन अधिक मजबूत होईल. प्रास्ताविक खरेदी-विक्री संघाचे सभापती ज्ञानेश्वर निकम यांनी केले. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी, तर आभारप्रदर्शन शिवाजी थेटे यांनी केले.

Uday Samant
Ajit Pawar Tribute | नायगाव शहरात अजितदादांना श्रद्धांजली; दुकाने बंद ठेवून हेडगेवार चौकात अभिवादन

कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

जमिनीच्या भावाबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, या मेळाव्यास बाजार समितीचे सभापती डॉ. मनोज राठोड, उपसभापती जयेश बोरसे, संचालक साईनाथ आल्हाड, महिला तालुकध्यक्ष सोनाली धाटबळे, पंचायत समितीच्या सभापती सुप्रिया घुगे, शिवाजी थेटे, पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर झाल्टे, केशव राठोड, किशोर पवार, नारायण बोडखे, राम पवार, नगरसेवक प्रकाश अग्रवाल, रामेश्वर धनकर, संतोष पवार, रत्नाकर पंडित, सरपंच रवी राठोड, आदित्य गर्जे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news