Ajit Pawar Tribute | नायगाव शहरात अजितदादांना श्रद्धांजली; दुकाने बंद ठेवून हेडगेवार चौकात अभिवादन

सामाजिक व राजकीय योगदानाबद्दल उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या
नायगाव शहरात अजितदादांना श्रद्धांजली
नायगाव शहरात अजितदादांना श्रद्धांजली
Published on
Updated on

नायगाव : शिवराज पाटील होटाळकर , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (दक्षिण) अध्यक्ष यांच्या मित्रमंडळाच्या व नायगाव शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने नायगाव शहरात अजितदादा पवार यांच्या निधनाचे वृत् समजताच शोक व्यक्त करण्यात आला. यावेळी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून डॉ. हेडगेवार चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या श्रद्धांजली कार्यक्रमात अजितदादांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या सामाजिक व राजकीय योगदानाबद्दल उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या. शहरात शांततेचे व शोकमय वातावरण होते. यावेळी दत्तात्रय पाटील होटाळकर,,रजीत पाटील देसाई, प्रदीप पाटील पवळे,सचिन पाटील कल्याण, हनुमंत पाटील शिंदे, प्रदीप सावकार देमेवार, शंकर वडपत्रे, अक्षय पाटील चव्हाण, सचिन पाटील कल्याण, शिवराज पाटील चव्हाण, रितेश पाटील कल्याण, शिवराज पाटील शिंदे (मांजरमकर), आनंदराव पाटील हांडगे, सटवाजी मोदलवाड, गजानन भालेराव, सय्यद साब, समीर शेख, अतुल पाटील मंगरुळे, किशोर कल्याण आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम शांततेत पार पडला असून उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

हिमायतनगरः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच शहरांसह तालुक्यात दुःखाचे सावट पसरले होते. नगरपंचायत कार्यालयात सर्वच पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

याप्रसंगी नगराध्यक्ष शेख रफिकभाई, उपाध्यक्ष विनोद गुंडेवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन सुर्यवंशी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जनार्दन ताडेवाड , सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष गजानन चायल, नगरसेवक प्रतिनिधी आखीलभाई, हाजी समदखान , फेरोजखान,नगरसेवक सरदार खान, रमेश पंडीत ,अ कलीमभाई, संभाजी मेंडके, इलियास, विठ्ठल ठाकरे,कुणाल राठोड , जिशानभाई मिर्झा , डॉ राजेंद्र वानखेडे,आशीष सकवान , भारत डाके,सुभाष बलपेलवाड , संतोष मुदेवाड,माजी उपनगराध्यक्ष मो जावेद हाजी अब्दुल गन्नी,ऊदय देशपांडे, रहिम सेट ,शाम ढगे, शेख हनिफ, राजीव जाधव , गणेश रच्चेवार,खालीदभाई, दीपक कात्रे , नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी यांच्या सह सर्वच पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news