Crime News : गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटक

पिस्तुलात एक काडतूस होते लोड, पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला
Crime News
Crime News : गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसांसह दोन तरुणांना अटकfile photo
Published on
Updated on

Two youths arrested with a country-made pistol and three live cartridges

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोन तरुणांना बेगमपुरा पोलिसांनी जटवाडा रोडवरील गॅलेक्सी टर्फ येथून रविवारी (दि. ६) सायंकाळी अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पिस्तुलामध्ये एक काडतूस लोड केलेले असल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Crime News
Kunbi record : ग्रा.पं. निहाय कुणबी नोंदींच्या याद्या लावा

अरबाज अलीम शेख (१९, रा. जटवाडा गाव) आणि खान आय्यान नईम खान (२१, रा. जफर पार्क, जटवाडा रोड, पेट्रोल पंपाजवळ) अशी आरोपींची नावे आहेत. दोघांनाही न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली. जटवाडा रोडवरील गॅलेक्सी टर्फजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काही तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पथकाने धाव घेऊन अरबाज याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे पिस्तूल (मॅगझिनसह) आणि ३ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा मिळून आला. अरबाजकडे शस्त्राबाबत चौकशी केली असता, त्याने हे पिस्तूल त्याचा मित्र खान आय्यान याने दिल्याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून अय्यान खान यालाही ताब्यात घेतले.

Crime News
Crime News : पैसे मागितल्याच्या रागातून भावाच्या कुटुंबावर हल्ला; पिता-पुत्राला ५ वर्षे सक्तमजुरी

पोलिसांनी दोन्ही आरोपींचे मोबाईल तपासले असता, अरबाजच्या मोबाईल गॅलरीत या पिस्तुलाचे फोटो आणि व्हिडीओ मिळून आले. आरोपी अय्यान हा टर्फमध्येच काम करतो, तर अरबाज मजुरीचे काम करतो. याप्रकरणी बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मारुती मदेवाड, मनीषा केदार, हवालदार उमेश ठाकूर आणि शैलेश नलावडे यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news