

Display the lists of Kunbi records, categorized by Gram Panchayat
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात जुन्या दस्तऐवजांमध्ये आढळलेल्या मराठा, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जात नोंदी आता नागरिकांना सहज उपलब्ध होणार आहेत. जिल्हा प्रशासनाने या नोंदी व संबंधित दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यासोबतच प्रत्येक गावांच्या ग्रामपंचायतींनिहाय या याद्या प्रसिद्ध कराव्यात, असे आदेश सोमवारी (दि. ७) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
यावेळी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, सहआयुक्त मंजूषा मिस्कर हे विभागीय आयुक्तालयातून तर जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते हे जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठकीत होते. मराठा आरक्षण या बैठकीत विखे पाटील यांनी विभागातील आठही जिल्ह्यांत मंडळनिहाय शिबिरे घेऊन नागरिकांना नोंदी पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मराठवाड्यात १७ सप्टेंबरला विशेष ग्रामसभा घेऊनही ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. मोडी व उर्दू लिपीतील नोंदींचे भाषांतर आणि लिप्यंतराची सुविधाही उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील 'मराठा कुणबी दस्त नोंदी' या स्वतंत्र टॅगवर तालुकानिहाय याद्या उपलब्ध आहेत. संबंधित यादीवर क्लिक केल्यानंतर नाव, दस्ताचा प्रकार तसेच डिजिटल प्रमाणित दस्तऐवज पाहता येणार आहे.
संभाजीनगरची स्थिती
जिल्ह्यात जुन्या दस्तऐवजांमधून एकूण ५ हजार ११३ कुणबी नोंदी आढळल्या आहेत. यामध्ये सोयगाव ३१, पैठण १८४, वैजापूर ६८७, सिल्लोड ३५७, गंगापूर ७६१, खुलताबाद ३४१, फुलंब्री २६१, छत्रपती संभाजीनगर १ हजार ३९ आणि कन्नडमध्ये सर्वाधिक १ हजार ४५२ नोंदी आहेत.
प्रमुख शिबिरांचे नियोजन
अपर तहसील छत्रपती संभाजीनगर : भावसिंगपुरा (१० सप्टेंबर), पंढरपूर ११ सप्टेंबर, कांचनवाडी १२ सप्टेंबर, उस्मापूरा १५ सप्टेंबर, छत्रपती संभाजीनगर १७ सप्टेंबर
छत्रपती संभाजीनगर : चौकामध्ये १० सप्टेंबरला; वरुड काझी, पिसादेवी ११ सप्टेंबर, शेकटा, लाडसावंगी १२ सप्टेंबर, चिकलठाणा, करमाड १५ सप्टेंबर; कचनेर, चित्तेपिंपळगाव १६ सप्टेंबर.
पैठण : १० सप्टेंबर पाचोड, आडूळ; ११ सप्टेंबर आपेगाव, विहामांडवा; १२ सप्टेंबर पैठण, पिंपळवाडी; १५ सप्टेंबर बालानगर, नादर; १६ सप्टेंबर ढोरकीन, निलजगाव; १७सप्टेंबर बिडकीन, लोहगाव.
फुलंब्री : १० सप्टेंबर आळंद; ११ सप्टेंबर बाबरा; १५ सप्टेंबर पिरबावडा; १६सप्टेंबर वडोद बाजार.
खुलताबाद : १० सप्टेंबर खुलताबाद; ११ सप्टेंबर वेरूळ; १२ सप्टेंबर सुलतानपूर; १३ सप्टेंबर बाजारसावंगी.
कन्नड : १० सप्टेंबर नाचनवेल, चिंचोली, लिंबाजी; ११ सप्टेंबर देवगाव रंगारी,
चापानेर; १२ सप्टेंबर हतनूर, चिकलठाण; १३ सप्टेंबर कन्नड, नागद; १५ सप्टेंबर करंजखेडा.
सिल्लोड : १० सप्टेंबर भराडी, बोरगाव बाजार, आमठाणा; ११ सप्टेंबर सिल्लोड, पालोद, निल्लोड; १५ सप्टेंबर अंभई; १६ सप्टेंबर अजिंठा, शिवना; १७ सप्टेंबर गोळेगाव बु., उंडणगाव.
सोयगाव : ११ सप्टेंबर सोयगाव, सावळदबारा; १५ सप्टेंबर जरंडी; १६ सप्टेंबर बनोटी.
गंगापूर : १० सप्टेंबर वाळूज, तुर्काबाद; ११ सप्टेंबर आसेगाव, गाजगाव; १२ सप्टेंबर हसूल, डोणगाव; १५ सप्टेंबर सिद्धनाथ वडगाव, गंगापूर; १६ सप्टेंबर मांजरी, जामगाव; १७ सप्टेंबर भेंडाळा, शेदूरवादा.
वैजापूर : ११ सप्टेंबर लोणी खु., जानेफळ; १२ सप्टेंबर गारज, शिऊर, खंडाळा, बोरसर; १५ सप्टेंबर लासूरगाव, महालगाव; १६ सप्टेंबर बाबतरा, नागमठाण; १७ सप्टेंबर वैजापूर, घायगाव.; १५ सप्टेंबर चिकलठाणा