Accident News : पाचोडजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक; चार जण गंभीर जखमी

पाचोड-पैठण राज्य महामार्गावर पाचोड जवळील भुमरे पेट्रोल पंपासमोर बुधवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन चार जण गंभीर जखमी झाले.
Accident News
Accident News : पाचोडजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक; चार जण गंभीर जखमीfile photo
Published on: 
Updated on: 

Two two-wheelers collide head-on near Pachod; four people critically injured

पाचोड, पुढारी वृत्तसेवा : पाचोड-पैठण राज्य महामार्गावर पाचोड जवळील भुमरे पेट्रोल पंपासमोर बुधवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन चार जण गंभीर जखमी झाले.

Accident News
Sambhajinagar News : अभियानाचा गौरव सोहळा; जिल्हा परिषदेचा निधी मात्र अडकला !

प्रशांत पैठणे (३०), अयुब नणेखा पठाण (४५, दोघे रा. चिंचखेड, ता. अंबड) आणि संजय दयनदेव वाव्हल (३०), सुरज शिवनाथ पवार (२२, दोघे रा. लिंबगाव, ता. पैठण) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.

चिंचखेड येथील प्रशांत पैठणे व अयुब पठाण हे दुचाकीने (एमएच २० एफ एफ ८९५८) नेवासा येथे दवाखान्याच्या कामासाठी गेले होते. तेथून परतत असताना, तर लिंबगाव येथील संजय वाव्हल व सुरज पवार हे पाचोडहून दुचाकीवरून (एमएच २० बी डब्ल्यू ७६१०) लिंबगावकडे येत होते. दरम्यान, भुमरे पेट्रोल पंपासमोर या दोन्ही दुचाकींची भरधाव वेगात समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत दोन्ही दुचाकींवरील चौघेही लांब फेकले गेले. त्यांच्या डोक्याला, हाताला व पायाला गंभीर मार लागला.

Accident News
Gold adulteration: सोन्यात भेसळीचा नवा फंडा: २४-कॅरेट चाचणीतही पास होणारी रहस्यमय चिनी पावडर; कशी ओळखायची?

अपघात घडताच पाचोड येथील अविनाश मिसाळ, तर लिंबगावातील अमोल हिंगले, अविनाश पवार, अविनाश कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना तातडीने खासगी वाहनातून पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. जायभाये व परिचारिकांनी तातडीने जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात रुग्णवाहिकेतून हलविले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.