Sambhajinagar Crime : एक को टपकाया, और दो को टपकाना है म्हणणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

अट्टल गुन्हेगारांकडून दोन पिस्टलसह सहा जिवंत काडतुसे जप्त
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime : एक को टपकाया, और दो को टपकाना है म्हणणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात File Photo
Published on
Updated on

Two pistols and six live cartridges seized from hardened criminals

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एक को टपकाया, और दो को टपकाना है म्हणत पिस्टलचा धाक दाखवून येणार्या जाणाऱ्यांना लुटणार्या तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या अट्टल गुन्-हेगारांस गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.२४) रात्री ११ च्या सुमारास नारळीबाग परिसरात दोन पिस्टल व सहा जिवंत काडतुसांसह अटक केली. शेख अशफाक शेख ईसाक (३२ रा. शहा बाजार) असे त्या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्या विरोधात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar News : हमीभावाची ऐशी की तैशी, सोयाबीन, कपाशीची हजार रुपये कमी दराने खरेदी

गुन्हे शाखेच्या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख अशफाक नारळीबाग परिसरात बंद पडलेल्या इमारती जवळ पिस्टलसह जाणाऱ्या येणाऱ्यांना एक को टपकाया, और दो दो को टपकाना है है असे म्हणत धमकावत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेत रात्री ११ च्या सुमरास शेख अशफाकला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला दोन पिस्टल व प्रत्येकी तीन काडतुसे असल्याचे आढळून आले. या पथकाने त्याच्या जवळून सुमारे १ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दिवाळी ओलीचिंब, कापूस, मका, चारा पिकांचे मोठे नुकसान

अनेक ठाण्यांत गुन्हे दाखल

रेकॉर्डवरील गुन्हेगार शेख अशफाक शेख ईसाक याच्याविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्याविरुद्ध सिटीचौक, जिन्सी-२, बेगमपुरा आणि आज पुन्हा सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, सपो. आयुक्त संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर, पोउपनि प्रवीण वाघ, संदीप तायडे, विक्रम खंडागळे, राजेश यदमळ, मनोज विखणकर, सोमकांत भालेराव, विजय निकम, अमोल मुगळे, सोमनाथ दुकले आदींच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news