Sambhajinagar Crime : चाकूचा धाक दाखवून दोघांनी कॉन्ट्रॅक्टरला लुटले

५ लाखांच्या खंडणीची केली मागणी,बीडचा संतोष देशमुख करण्याची धमकी
Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Crime : चाकूचा धाक दाखवून दोघांनी कॉन्ट्रॅक्टरला लुटलेFile Photo
Published on
Updated on

Two men robbed a contractor at knifepoint

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एका सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर तसेच राजकीय पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला दोघांनी सातारा परिसरातील नाथ व्हॅली येथे चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील ४६ हजार ८०० रुपये हिसकावले. ते एवढ्यावरच थांबले नाही तर पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पाच लाख सकाळपर्यंत नाही पोहोचले तर तुझा बीडचा संतोष देशमुख करू, अशी धमकी दिली. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुख्य सुत्रधार भगवान मुसळे याला गुरुवारी (दि.सात) सातार पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा एक साथीदार फरार असून या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sambhajinagar Crime News
‌‘वंदे मातरम्‌‍‌’ ला सर्वप्रथम मास्टर फुलंब्रीकरांनी लावली चाल

सिद्धार्थ मंगलराव साळवे (३९, रा. समतानगर) हे खासगी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असून, ते एका मोठ्या पक्षाचे पदाधिकारीही आहेत. ४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास साळवे हे कारने मित्र स्वराज दहिवाल यांच्यासह ४० ग्रीन्स सोसायटीच्या पाठीमागील रस्त्याने जात होते. त्याचवेळी अंधाराचा फायदा घेत एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावून गाडी थांबवली. साळवे खाली उतरले असता, गाडी अडवणाऱ्यांपैकी एक जण भगवान मुसळे असल्याचे त्यांना दिसले.

साळवे यांनी गाडी अडवण्याचे कारण विचारले असता, मुसळे याने साळवे यांना बेदम मारहाण केली. चाकू साळवेंच्या गळ्याला लावून आरडाओरड केली तर इथेच संपवेन, अशी धमकी देत त्यांच्या खिशातून रोख ४६ हजार ८०० रुपये काढून घेतले.

Sambhajinagar Crime News
Sambhajinagar Political News : निवडणूक कशी लढायची, वरिष्ठ म्हणतील तशी

सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या घटनेदरम्यान साळवेचा मित्र स्वराज दहिवाललाही बेदम मारहाण केली. ते एवढ्यावर थांबले नाही तर सकाळपर्यंत पाच लाख रुपये पोहोचले पाहिजेत, नाही तर तुझा बीडचा संतोष देशमुख करून तुझ्या कुटुंबीयालाही संपवण्याची धमकी दिली. या प्रकरणी साळवे यांच्या तक्रारीवरून सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक शैलेश देशमुख करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news