

Two bikers killed in vehicle collision
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा : फुलंब्री-खुलताबाद रस्त्यावरील शांतीनिकेतन शाळेसमोर आज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार झाले. हा अपघात बुधवारी (दि.२०) रात्री नऊ वाजेदरम्यान घडला.
वारेगाव (ता. फुलंब्री) येथील नीलेश शेकू शंकपाळ (२८) व मच्छिद्र सटवाजी कापसे (३५) हे दोघे दुचाकीने (एम. एच. २० यू एल. ४४२५) फुलंब्रीकडे येत होते. शांतीनिकेतन शाळेसमोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात नीलेश संकपाळ यांचा जागेवरच मृत्यू झाला तर मच्छिद्र कापसे यांना उपचारास नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
मच्छिद्र कापसे याची आई बाहेरगावरून फुलंब्री येथे आली होती. तिला आणण्यासाठी हे दोघे जण फुलंब्रीला येत असताना हा अपघात झाला.
दुभाजकामुळे अपघात हा अपघात चुकीच्या दुहेरी दुभाजाकमुळे झाला झाल्याचे वारेगाव येथील नागरिकांचे म्हणणे आहे. हे दुभाजक रात्री दिसत नाही व यास रेडियम किंवा फलकही नाही. या दुभाजाकच्या बऱ्याच तक्रारी झाल्या. वर्षभरात पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला, मात्र याकडे संबंधित लक्ष देत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.