AYUSH hospital : संभाजीनगरात दोन आयुष रुग्णालय : मंत्री जाधव

मनपानेही दिला ५० खाटांच्या नवीन रुग्णालयाचा प्रस्ताव
AYUSH hospitals Sambhajinagar
संभाजीनगरात दोन आयुष रुग्णालय : मंत्री जाधवfile photo
Published on
Updated on

Two AYUSH hospitals in Sambhajinagar: Minister Jadhav

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगरसाठी मंजूर जिल्हा आयुष रुग्णालय हे शासनाकडूनच जागा मिळत नसल्याने रखडले असताना मनपाने ही ५० खाटांच्या नवीन आयुष रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. मनपा आरोग्य विभागामार्फत हे आयुष रुग्णालय चालवले जाईल. तर आधीचे मंजूर आयुष रुग्णालयाचे काम जागा निश्चित होताच सुरू होईल, असे आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतावराव जाधव यांनी सांगितले.

AYUSH hospitals Sambhajinagar
जमीन करमाडची, मालक हैदराबादचे अन् तिरुपतीची तोतया महिला

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत संभाजीनगरातील सिडको जीएसटी भवन येथे आयुष व सीजीएचएस वेलनेस सेंटरमध्ये आयुवेर्दिक युनिटचे उद्घाटन रविवारी (दि.८) त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर प्रतापराव जाधव माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, सरकारकडून संभाजीनगरसाठी ५० बेडचे आयुष रुग्णालय मंजूर असून, जिल्हा प्रशासनाकडून निश्चित जागा उपलब्ध होताच याचे टेंडरही काढले जाईल.

पारंपरिक उपचारावरील औषधी सहजरीत्या उपलब्ध व्हावी म्हणून पीपीपी तत्वावर स्वतंत्र आयुष औषधी केंद्रही सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सीजीएचएस अंतर्गत सुरू केलेल्या आयुष वेलनेस सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आयुर्वेद व पारंपरिक उपचार पद्धतींचा लाभमिळणार असून, हे केंद्र सर्वांगीण आरोग्य सेवेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी आ. बाबुराव कोहळीकर, केंद्रीय जीएसटी आयुक्त प्रदिप गुरुमुर्ती, आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ. दयानंद मोतीपवळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, मनपा उपायुक्त डॉ. अंकुश पांढरे, डॉ. सी. पी. चौधरी, सीएमओ डॉ. रुपाली कदेरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी बालकमल यांनी केले.

AYUSH hospitals Sambhajinagar
Crime News : पिस्तुलातून फायर केल्याने तरुण गंभीर जखमी

राज्यात आयुवेर्दिक एम्ससाठी प्रयत्न

केंद्रीय अर्थसंकल्पात तीन नवीन आयुर्वेदिक एम्सची घोषणा करण्यात आली आहे. यापैकी एक एम्स महाराष्ट्र राज्यात यावे, यासाठी मंत्री म्हणून माझे पुरेपूर प्रयत्न सुरू असल्याचे प्रतापराव जाधव म्हणाले. इतर राज्यातील मुख्यमंत्रीही त्यांच्याकडे एम्स व्हावे, म्हणून जोर लावत आहेत. मात्र, अंतिम निर्णय पंतप्रधान घेतील, असेही त्यांनी सांगितले.

हडको एन-११ येथे आयुष रुग्णालय

मनपा कार्यक्षेत्रात कोणतेही आयुष रुग्णालय नाही. त्यामुळे शहरात शासकीय आयुष रुग्णालय व्हावे, यासाठी मनपाने हडको एन-११ येथील आरोग्य केंद्रात आयुष रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे, असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ. मंडलेचा म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news